इसिसच्या सहा युवकांच्या विरोधात आरोप निश्‍चीत

नवी दिल्ली – दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणावर दहशतवादी कारवाया घडवून आणण्याचा कट रचल्याप्रकरणी केरळातील न्यायालयात सहा युवकांच्या विरोधात आरोप निश्‍चीत करण्यात आले आहेत. एनआयएच्यावतीने हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

एनआयएने 1 ऑक्‍टोबर 2016 रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गटाचे नेटवर्क केरळ बरोबरच तामिळनाडुतही आहे. त्या नेटवर्क मधील युवकांनी अन्सार उल खलिफा या नावाने गट स्थापन केला होता. न्यायाधिशांसह काही महत्वाच्या व्यक्तींवर हल्ला करण्याची त्यांनी योजना आखली होती.

भारतात राहणाऱ्या काही विदेशी नागरीकांनाही लक्ष्य करण्याचा त्यांचा कट होता. या आरोपींना कन्नुर जिल्ह्यात अटक करण्यात आली होती. यातील काही जणांचा इराक आणि सीरियामधील इस्लामिक स्टेटच्या गनिमांशी थेट संबंध होता आणि यातील सुबहानी हाजा मोईनुद्दीन उर्फ अबु जसमीन हा एप्रिल 2015 मध्ये इराक आणि सीरियाच्या भेटीवर गेला होता अशी माहितीही एनआयएला मिळाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)