इसिसची मोठी कत्तल उघडकीस; एकाच कबरीत 470 मृतदेह!

बगदाद – इराकच्या संयुक्त मोहीम कमांडने (जेओसी) केलेल्या कारवाईत एकाच कबरीत दफन केलेले तब्बल 470 मृतदेहांचे अवशेष सापडले आहेत. त्यासोबतच 30 मृतदेह दफन केलेली आणखी एक कबर सापडली आहे. त्यामुळे इसिस या दहशतवादी संघटनेने केलेली एक मोठी कत्तल उघडकीस आली आहे.

शुक्रवारी मोसुल येथे बादौश जेल या तुरुंगाजवळ या दोन कबरी आढळल्या. त्यात एका कबरी 470 मृतदेह आणि दुसऱ्या कबरीत 30 मृतदेह सापडले. या दोन्ही कबरींमध्ये सापडलेल्या मृतदेहांची हत्या इसिसच्या दहशतवाद्यांनीच केली होती, असे शिन्हुआ या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. बादौश जेल येथेच इसिसच्या दहशतवाद्यांनी मोठी कत्तल केली होती. इसिसच्या दहशतवाद्यांनी 10 जून 2014 रोजी 600 पेक्षा जास्त कैद्यांना जीवे मारले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)