इसिसकडून पुन्हा फ्रान्स टार्गेट

 पॅरिस : फ्रान्सला पुन्हा एकदा इसिसच्या दहशतवाद्यांनी लक्ष्य केले आहे. दक्षिण फ्रान्समधील कार्कसॉन शहरात चार पोलिसांवर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत तर तिथून १५ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या ट्रीब्ज शहरातही एका सुपरमार्केटमध्ये घुसून दहशतवाद्याने जवळपास ८ जणांना ओलीस धरल्याची माहिती समोर येत आहे. आतापर्यंत किमान दोन जणांचा या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

स्थानिक वेळेनुसार सकाळी ११.१५ वाजता हा हल्ला झाला. एक सशत्र दहशतवादी ‘सुपर व्ही’ या सुपरमार्केटमध्ये घुसला आणि लगेचच गोळीबाराचा आवाज ऐकू आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अन्य हल्ल्यात एक पोलीस गंभीररित्या जखमी झाला आहे.  फ्रान्सच्या अंतर्गत व्यवहार मंत्रालयाने या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी घटनास्थळाचा ताबा घेतला असून पुढील कारवाई सुरू झाली आहे, असेही सांगण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)