इसबगोल आणि आरोग्यरक्षण

  सुजाता गानू

इसबगोल पित्तशामक असल्यामुळे पित्ताच्या विकारात अत्यंत गुणकारी आहे. आमांश झाला असल्यास इसबगोल हे शीतवीर्य असून आमांश थांबविते.

अतिसारावर – फार वेळ परसाकडे होत असेल तर तीन ग्रॅम इसबगोल 50 मि. लि. पाण्यात भिजत घालावे. भिजले म्हणजे त्यात सहा ग्रॅम खडीसाखर घालून द्यावे म्हणजे रोज परसाकडे साफ होते.

अंगातील कडकीवर- अंगातील कडकी कमी होण्यासाठी पाव लिटर गाईच्या दुधात 20 ग्रॅम खडीसाखरेत रात्री 10 ग्रॅम भिजवलेले इसबगोल घालून सकाळी प्यावे. अंगातील कडकी निघून जाते.

संधिवात व सूजेवर बहुगुणी- इसबगोल पाण्यात भिजत घालून वाटून तयार केलेला लगदा संधिवातात वेदनेच्या ठिकाणी लावावा. तसेच वातरक्तामुळे शरीराला सूज येते. अशावेळी सूजच्या अवयवांवर भिजवलेलया इसबगोलचा लेप लावला असता अंगावरील सूज कमी होते.

आतड्यातील व्रणावर- इसबगोल हे अत्यंत उपयुक्‍त आहे. ते आतड्यातील आंतरत्वचेला स्निग्ध बनवते. त्यामुळे आतड्यातील व्रण बरे होतात.

आमदोष व संग्रहणीवर- आमदोष व संग्रहणीवर इसबगोलाचे औषध लागू पडते.

पोटदुखी, पोटातील गुबारा यासाठी- जर का पोट असह्य दुखत असेल किंवाप पोटात गुबारा धरला गेला असेल तर

इसबगोलचे चूर्ण थोडीशी खडीसाखर घालून मोठ्या मात्रेत द्यावे. लगेच जुलाब होऊन पोट साफ होते.

मूळव्याधीवर- साखरेचे पाणी किंवा ताज्या ताकाबरोबर अथवा गाईच्या दुधाबरोबर एक मोठा चमचा इसबगोल चूर्ण दररोज रात्री घ्यावे. यामुळे मुळव्याध बरी व्हायला मदत होते.

लघवी साफ होण्यासाठी- लघवीची तक्रार इसबगोल चूर्णामुळे बरी व्हायला मदत होते.

घशाला जर वारंवार कोरड पडत असेल तर… घशाची कोरड इसबगोल आदल्या दिवशी भिजत टाकून दुसऱ्या दिवशी गाईच्या दुधातून खडीसाखर घालून घेतले असता घशाची कोरड थांबते.

जुन्या मुरड्यावर- जुन्या जीर्ण मुरड्यामध्ये 2 ग्रॅम भाजलेले इंद्रजव चूर्ण, इसबगोल चूर्ण 1 चमचा व साखर 5 ग्रॅम दिवसातून 3 वेळा पाण्याबरोबर अथवा ताज्या ताकाबरोबर घेतल्यामुळे आराम पडतो. मुरड्यातील प्रत्येक औषधाबरोबर इसबगोल चूर्ण साखरेबरोबर घेतल्यास त्याचा उत्तम फायदाच होतो. जुन्या मुरड्याचे दुखणे हटते. अशाप्रकारे आयुर्वेदियदृष्ट्या इसबगोल हे महत्त्वाचे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)