इलेक्‍ट्रीकल कॉन्ट्रॅक्‍टरचे अभिनव आंदोलन

पिंपरी – शहराची वाढती थ्री फेज मीटरची मागणी लक्षात व त्याचा पुरवठा करण्यात दिरंगाई करणाऱ्या महा-वितरण प्रशासनाविरोधात पिंपरी-चिंचवड इलेक्‍ट्रिकल असोसिएशनने महा-वितरणच्या पिंपरी विभागीय कार्यालयाबाहेर फ्लेक्‍स लावून शुक्रवार दि. 12 ला अनोखे आंदोलन केले.

पिंपरी-चिंचवड शहरात थ्री फेज मीटरला मोठी मागणी असून शेकडो ग्राहक या मीटरच्या प्रतिक्षेत आहेत. हे मीटर मुबलक प्रमाणात उपलब्ध करुन दिले असल्याची माहिती महा-वितरण प्रशासनाकडून प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध केली जात आहे. मात्र, या वृत्ताचा संदर्भ देत शहरातील सर्व ग्राहकांकडून मीटरची मागणी केली जात आहे. याबाबत पिंपरी-चिंचवड इलेक्‍ट्रीकल कॉन्ट्रॅक्‍टर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची भेट घेऊन थ्री फेज मीटर उपलब्ध होत नसल्याची माहिती दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावर त्यांनी प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांच्याशी फोनवर विचारणा केली असता त्यांनी खासदार आढळराव यांना मीटर्स उपलब्ध करून देऊ, असे आश्‍वासन दिले. त्यानंतर असोसिएशनचे सर्व पदाधिकाऱ्यांनी पुण्यात अधीक्षक अभियंता महेंद्र दिवाकर यांची भेट घेतली असता त्यांनी मीटर्स उपलब्ध करून देण्यास हतबलता दर्शवली. दिवाकर यांची हतबलता पाहून या पदाधिकाऱ्यांनी ताकसांडे यांच्या कार्यालयाकडे मोर्चा वळवला. ताकसांडे यांना मीटर्सबाबत विचारणा केली असता हा धोरणात्मक निर्णय असून वरिष्ठ कार्यालयातून मीटर वाटप होते. मी आता काहीही सांगू शकत नाही व कधी मीटर्स येणार, हे देखील सांगू शकत नाही, अशी हतबलता व्यक्‍त केली.

महा-वितरण प्रशासनाच्या या कचखाऊ धोरणाचा निषेध करत पिंपरी-चिंचवड इलेक्‍ट्रीकल कॉन्टॅक्‍टर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी भोसरी व पिंपरी विभागीय कार्यालयांसमोर थ्री फेज मीटर उपलब्ध होत नसल्याबाबतची हतबलता अशा मथळ्याचा फ्लेक्‍स लावून अभिनव पद्धतीने आंदोलन केले. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश बक्षी, कार्याध्यक्ष संतोष सौंदणकर, सचिव नितीन बोंडे, बाळासाहेब मलांगणे, नटराज बोबडे, मनेश शेळके, संजय पाटील, संजय पवार, मंगेश सोनकांबळे, भूषण साळवे, संजय मोरे आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)