इलेक्‍ट्रिक वाहनांची मागणी वाढणार असल्यामुळे बॅटरी उद्योग फोफावणार

नवी दिल्ली- इलेक्‍ट्रॉनिक कारमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग बॅटरी समजला जातो. कमीतकमी वेळेत चार्ज होत दीर्घकाळ चालणाऱ्या बॅटरीची आवश्‍यकता आहे. यामुळे कंपन्यांकडून या क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्यात येत आहे. पुढील 12 वर्षात इलेक्‍ट्रॉनिक कारच्या बॅटरीची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना 2,735 अब्ज रुपयांची संधी आहे. सध्या डिझेल आणि पेट्रोल प्रकारातील इंजिनांचा वापर करण्यात येत आहे.

सध्या इलेक्‍ट्रॉनिक कारच्या बॅटरीच्या आधुनिक तंत्रज्ञानाला मोठी मागणी असून पारंपरिक बॅटरीचा वापर 2025 पासून बंद होईल. याऐवजी लिथियम आयन बॅटरीचा वापर करण्यात येईल. 2030 पर्यंत लिथियम आयन बॅटरीचा उद्योग 2,735 अब्ज रुपयांवर पोहोचेल. सध्या लिड ऍसिडच्या बॅटरीचा वापर करण्यात येत आहे. इलेक्‍ट्रॉनिक कारमध्ये लिथियमचा वापर करण्यात आल्यानंतर या पारंपरिक बॅटरीचाही वापर कायम राहील. सध्या अनेक कारमधील बॅटरीमध्ये 12 वॅट लिड ऍसिडचा समावेश आहे. सध्या एका साधारण कारच्या एकूण खर्चापैकी इंजिन, ट्रान्समिशन आणि नियंत्रण युनिटचा खर्च 75 टक्‍के आहे. इलेक्‍ट्रॉनिक कारच्या बाबतीत बॅटरी पॅक आणि इलेक्‍ट्रिक मोटारचा खर्च 90 टक्‍के असतो. मारुती सुझुकी, हयुंदाई मोटार इंडिया, होंडा कार्स, टोयोटा या कार कंपन्या 2019 पासून इलेक्‍ट्रिक कार भारतीय बाजारपेठेत उतरविणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

1 COMMENT

  1. हे उद्योग सामान्यांच्या गरजेची छोटी वाहने का बनवीत नाहीत? जसे तीन चाकी इलेक्ट्रिक सायकल, कार, ई. निम्नवर्गियान्ना स्वतःचे स्थिर वाहन नको असते का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)