इरा शहा, सानिका भोगाडे, माही शिंदे, अपर्णा पतैत दुसऱ्या फेरीत 

एमएसएलटीए योनेक्‍स सनराईज बीव्हीजी करंडक अखिल भारतीय मानांकन टॅलेंट सिरीज टेनिस स्पर्धा 

पुणे – कुशल चौधरी, आर्यन हूड, अर्णव पापरकर, अदमीर शेख यांनी मुलांच्या गटात, तर इरा शहा, सानिका भोगाडे, माही शिंदे, अपर्णा पतैत यांनी मुलींच्या गटात आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करताना एमएसएलटीए योनेक्‍स सनराईज बीव्हीजी करंडक अखिल भारतीय मानांकन 12 व 14 वर्षांखालील टॅलेंट सिरीज टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) यांच्यातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. एमएसएलटीए स्कूल ऑफ टेनिस, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेतील 14 वर्षांखालील मुलींच्या एकेरीतील पहिल्या फेरीत अव्वल मानांकित इरा शहाने गार्गी फुलेचा 6-0, 6-2 असा पराभव करीत दुसरी फेरी गाठली.

मुलींच्या गटातील अन्य लढतीत पूर्वा भुजबळने कुंजल कंकचा 6-1, 2-6, 6-3 असा कडव्या झुंजीनंतर तीन सेटमध्ये पराभव केला. तर दानिका फर्नांडोने अन्वेषा दासचा 6-0, 6-0 असा एकतर्फी पराभव करताना पुढची फेरी गाठली. त्याचप्रमाणे आणखी एका लढतीत आठव्या मानांकित माही शिंदेने संस्कृती कायलला 6-0, 6-0 असे सहज नमविले.
याशिवाय 14 वर्षांखालील मुलांच्या गटात अव्वल मानांकित कुशल चौधरीने कुश गौडाला 6-2, 6-4 असे संघर्षपूर्ण लढतीअखेर पराभूत केले. तर शर्विल पाटीलने ऋषिकेश अय्यरचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. तसेच चतुर्थ मानांकित अंकिश भटेजाने वेद ठाकूरचे आव्हान 6-1, 6-3 असे संपुष्टात आणताना विजयी सलामी दिली. त्याचप्रमाणे सहाव्या मानांकित अदमीर शेखने बलवीर सिंगवर 6-1, 6-4 अशी सरळ सेटमध्ये मात करीत दुसऱ्या पेरीत आगेकूच केली.

सविस्तर निकाल – 
14 वर्षांखालील मुली – पहिली फेरी – इरा शहा (1) वि.वि. गार्गी फुले 6-0, 6-2; पूर्वा भुजबळ वि.वि. कुंजल कंक 6-1, 2-6, 6-3; दानिका फर्नांडो वि.वि. अन्वेषा दास 6-0, 6-0; माही शिंदे (8) वि.वि. संस्कृती कायल 6-0, 6-0; सोहा पाटील (3) वि.वि. ईशान्या हटनकर 3-6, 7-6 (1), 6-4; अपर्णा पतैत वि.वि. संचिता नगरकर 6-1, 6-1; चिन्मयी बागवे वि.वि. धनवी काळे 6-3, 6-0; सानिका भोगाडे वि.वि. हीर किंगर 6-3, 6-1;
14 वर्षांखालील मुले – कुशल चौधरी (1) वि.वि. कुश गौडा 6-2, 6-4; शर्विल पाटील वि.वि. ऋषिकेश अय्यर 6-3, 6-2; अंकिश भटेजा (4) वि.वि.वेद ठाकूर 6-1, 6-3; अदमीर शेख (6) वि.वि. बलवीर सिंग 6-1, 6-4; आर्यन हूड वि.वि. दक्ष कुकरेती 6-1, 6-1; अर्णव पापरकर वि.वि. क्रिश करपे 6-1, 6-3.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)