इराण अणू करार परिपूर्ण नाही, पण करार कायम ठेवणार – मर्केल

जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांचे स्पष्टिकरण

सोफिया – इराणचा अणू करार परिपूर्ण नसल्याची बाब युरोपिय संघातील देशांना मान्य आहे, अशी कबुली जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी दिली आहे. मात्र तरिही हा करार जपला जावा असे त्यांनी सुचवले आहे. अमेरिकेने यापूर्वीच या करारातून माघार घेतली आहे. सोफिया येथे युरोपिय देशांच्या नेत्यांच्या बैठकीमध्ये इराण अणू कराराबाबत चर्चा झाली. हा करार अबाधित राखला जावा, याला युरोपिय देशांना एकमुखी पाठिंबा दिला आहे.

इराणचा बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम किंवा मध्यपूर्वेतील संघर्षातील हस्तक्षेप रोखण्यासाठी अणू कराराद्वारे काहीही केले गेले नसल्याची तक्रार करून अमेरिका इराण अणू करारातून बाहेर पडली आणि अमेरिकेने इराणवर पुन्हा नव्याने निर्बंध घातले आहेत.

इराण अणू करार परिपूर्ण नाही हे युरोपिय संघातील सर्व देशांना पटले आहे. मात्र इराणवरच्या आक्षेपांबाबत वाटाघाटी व्हाव्यात, यासाठी या करारामध्ये कायम राहिले पाहिजे, असे मर्केल यांनी सांगितले.

इराणमधील व्यवसाय कायम रहावा यासाठी सध्याचा करार जिवंत रहावा यासाठी युरोपिय संघ प्रयत्नशील आहे. 2015 सालचा हा करार 2025 पर्यंत रहायला हवा, असे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सांगितले.

अणू करारामुळे मिळणारे आर्थिक फायदे कायम राहण्याची हमी मिळेपर्यंत कोणत्याही निर्बंधांशिवाय व्यवसायिक पातळीवर युरेनियम समृद्ध करण्यात येईल, असे इराणने म्हटले आहे. अणू करार वाचवण्यासाठी युरोपिय संघातील तज्ञांकडून उपाय योजना आखण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)