इराण अणुकरार वाचविण्यासाठी ब्रिटन, फ्रान्स निर्णयावर ठाम

लंडन : फ्रान्स आणि ब्रिटनने पुन्हा एकदा इराण अणुकरारावर ठाम राहण्याचे संकेत दिले आहेत. अणुकरार वाचवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असे दोन्ही देशांचे म्हणणे आहे. फ्रान्सचे विदेश मंत्री जीन येव्स ले ड्रिन यांनी लंडनमध्ये ब्रिटनचे विदेशमंत्री बोरिस जॉन्सन यांची भेट घेत अणुकराराबद्दलची भूमिका मांडली.

करार वाचविण्यासोबतच एकता देखील कायम राखू इच्छितो. अमेरिकेने करारातून अंग काढून घेतल्याचा अर्थ करार संपला असा होत नाही. आम्ही करारावर कायम आहोत आणि इराण यात सहकार्य करेपर्यंत करारावर ठाम राहू. आम्ही याप्रकरणी जर्मनीसोबत उभे आहोत असे ली ड्रिएन म्हणाले.

-Ads-

बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्समध्ये इराण, फ्रान्स, ब्रिटन आणि जर्मनीच्या विदेशमंत्र्यांदरम्यान इराण अणुकरारावरून बैठक झाली. ब्रिटन फ्रान्ससोबत मिळून या कराराच्या अस्तित्वासाठी कटिबद्ध आहे. ब्रिटन आणि युरोपात व्यापारासाठी मदत करण्याबद्दल बैठकीत चर्चा झाली. कराराचे अस्तित्व टिकविणे सोपे नसले तरीही आम्ही यासाठी जोरदार प्रयत्न करू असे जॉन्सन म्हणाले.

मॉस्को दौऱयावर असलेल्या इराणच्या विदेशमंत्र्यांनी अणुकरारावर स्वाक्षरी करणाऱया उर्वरित देशांनी याच्या अटींचे पालन करण्याचे आश्वासन द्यावे अशी मागणी केली आहे. इराणला निर्बंधांपासून दिलासा देण्याचे धोरण कायम ठेवले जावे असेही त्यांनी म्हटले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)