इराणहून तेल आयात सुरूच ठेवण्याचा भारताचा निर्णय

अमेरिकेचे इराणवरील निर्बंध झुगारले

नवी दिल्ली:अमेरिकेने इराणवर आर्थिक निर्बंध लागू केले आहेत येत्या नोव्हेंबर महिन्यांपासून ते अधिक कडक केले जाणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर इराणहून तेल आयात करणे भारताने थांबवावे अशी सुचना अमेरिकेने केली होती. तथापी या पार्श्‍वभूमीवर भारताने इराण हून तेल आयातीचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यानुसार भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्यांनी इराणला 1.25 दशलक्ष टन इतक्‍या तेलाच्या आयातीची ऑर्डर दिली आहे. तथापी आता तेलाची किंमत डॉलर्स ऐवजी रूपयात परावर्तीत केली जाणार आहे. युपीए सरकारच्या काळातही अमेरिकेचे जेव्हा इराणवर निर्बंध होते त्यावेळीही रूपयातच इराणला तेलाची किंमत चुकती केली जात होती.

-Ads-

तथापी इराणहून आयात केल्या जाणाऱ्या तेलाचे प्रमाण मात्र यावेळी काहीसे कमी करण्यात आले आहे. अमेरिका भारताला इराणहून तेल आयात करण्यास मुभा देईल पण त्याला काही कालमर्यादा असेल असे अमेरिकेचे विदेश मंत्री माईक पॉम्पेओ यांनी म्हटले होते. इंडियन ऑईल कंपनीने सन 2018-19 या वर्षात इराणहून 9 दशलक्ष टन तेलाची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.

तेलाची किंमत डॉलर्स ऐवजी रूपयांमध्ये चुकती करण्याच्या संबंधात इराण आणि भारतीय अधिकाऱ्यांची चर्चा सुरू आहे. अमेरिकेचे इराणवरील निर्बंध 4 नोव्हेंबर पासून लागू होत आहेत तेव्हा पासून तेलाची किंमत रूपयांमध्ये देण्याची व्यवस्था सुरू केली जाणार आहे. भारतीय चलनाचा वापर करून इराण भारतातून औषधे आणि अन्य तत्सम सामग्री त्यांच्या देशात आयात करीत असतो. भारत आणि इराण यांच्यातील देवाणघेवाणीचा व्यवहार इको बॅंक आणि आयडीबीआय बॅंकेकडून केला जातो. भारताने सन 2017-18 च्या आर्थिक वर्षात इराणहून 25 दशलक्ष डॉलर्स कच्चे तेल आयात केले होते.

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)