इराणवर लागू झाले आत्तापर्यंतच सर्वात कडक निर्बंध

वॉशिंग्टन: अमेरिकेने इराणवर लागू केलेले निर्बंध सोमवार पासून लागू झाले आहेत. आत्तापर्यंतचे त्यांच्यावर घालण्यात आलेले हे सर्वात कडक निर्बंध आहेत असे अमेरिकेचे विदेश मंत्री माईक पॉम्पेओ यांनी म्हटले आहे.

इराणने अमेरिकेशी काही वर्षांपुर्वी अणु करार केला होता व स्वत:वर या बाबतीत काही निर्बंध लागू करून घेतले होते. परंतु प्रत्यक्षात मात्र इराणचा गुप्त आण्विक कार्यक्रम सुरूच असल्याचा दावा करीत त्यांची या कराराच्या विषयीची भूमिका विश्‍वासार्ह नाही असे अमेरिकेने म्हटले होते व त्यांच्यावर येत्या 4 नोव्हेंबरपासून कडक आर्थिक निर्बंध लागू केले जातील अशी घोषणा अध्यक्ष ट्रम्प यांनी गेल्या मे महिन्यात केली होती. त्याची अंमलबजावणी आता सुरू झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अमेरिकेने इराणवर लागू केलेल्या आर्थिक निर्बंधांचा थेट फटका त्रयस्थ देशांतील कंपन्यांनाच अधिक भोगावा लागणार आहे कारण त्यांना आता इराणशी कोणतेही आर्थिक व्यवहार करता येणार नाहींत. इराणहून तेल आयात करणाऱ्या देशांनाही अमेरिकेने तंबी दिली आहे.

इराणचे सर्वोच्च नेते अयातोल्ला खामेनी यांनी अमेरिकेच्या निर्बंधांचा निषेध करतानाच त्यांच्या या निर्णयाचा आपल्या देशावर यत्किंचीतही परिणाम होणार नाहीं असे त्यांनी म्हटले आहे. दीर्घ काळ चालणाऱ्या या लढ्यात शेवटी अमेरिकेचीच हार होईल असेही त्यांनी म्हटले आहे. इराण हा तेल उत्पादक देशांच्या संघटनेतील तिसऱ्या क्रमांकाचा तेल निर्यातदार देश आहे. निर्बंधांमुळे त्यांना तेल निर्यातीवर मोठ्या प्रमाणात मर्यादा येणार असल्याने त्यातून निर्माण होणाऱ्या अडचणींचा ते कसा मुकाबला करणार हेही पहाणे महत्वाचे आहे. युरोपियन देश, जपान आणि दक्षिण कोरियाने इराणहून तेल आयात करणे पुर्ण थांबवले आहे. भारत आणि चीन यांनाहीं इराणची तेल आयात पुर्ण थांबवण्याची सूचना करण्यात आली आहे पण त्यांनी ती अजून मान्य केलेली नाही. इराण मधील राजवट दहशतवादी असून ती राजवट खाली खेचणे हे आमचे उद्दीष्ट आहे असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

दरम्यान भारत आणि चीन यांनी इराणहून तेलाची आयात पुढील सहा महिन्यात थांबवली नाही तर काय करणार असा थेट सवाल पॉम्पेओ यांना विचारण्यात आला असता ते म्हणाले की आम्ही नेमके काय करणार आहोत त्याची वाट पहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)