इराणकडून तेल आयातीबद्दल ट्रम्प यांची भारतासह अन्य देशांना तंबी

वॉशिंग्टन – भारतासह सर्व संबंधीत देशांनी येत्या 4 नोव्हेंबर पर्यंत इराणहून तेल आयात करणे थांबवावे अन्यथा तसे न केल्यास त्या देशांवरही अमेरिकेचे निर्बंध लागू केले जातील असा सज्जड इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.

भारतात इराणडून मोठ्या प्रमाणात तेल आयात केले, जाते. इराक आणि सौदी अरेबियाच्या खालोखाल इराणकडून भारत मोठ्या प्रमाणात तेल आयात करीत असतो. सन 2017-18 च्या पहिल्या दहा महिन्यात भारताने इराणकडून 18.4 दशलक्ष टन क्रुड ऑईल आयात केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

इराणकडून वादग्रस्त आण्विक कार्यक्रम राबवला जात आहे त्यावरून अमेरिकेने इराणवर पुन्हा निर्बंध लागू केले आहेत. मध्यंतरी अमेरिकेने इराणशी अण्विक समझोत्याचा करार केला होता. पण इराणने विश्‍वासघात केल्याने अमेरिका या करारातून बाहेर पडली आहे. त्यांनी आता इराणला नमवण्यासाठी अन्य देशांवर तेल आयातीच्या बाबतीत दबाव आणायला सुरूवात केली आहे.

सर्व विदेशी कंपन्यांनी 90 ते 180 दिवसांत इराणशी असलेले आपले सर्व व्यवहार गुंडाळून ठेवावेत अन्यथा त्यांना जबर किंमत मोजावी लागेल असा इशाराहीं अमेरिकेन या आधीच दिला आहे. आता त्यांनी इराणहून तेल आयात करणाऱ्या देशांना दबावात घ्यायला सुरूवात केली आहे. भारतीय आणि चीनी कंपन्यांनी 4 नोव्हेंबर पर्यंत आपली आयात पुर्णपणे थांबवावी अन्यथा त्यांच्यावरही अन्य देशांतील कंपन्यांप्रमाणेच निर्बंध लागू केले जातील असे अमेरिकेने बजावले आहे. भारत आता अमेरिकेच्या या धमकीला कशा प्रकारे प्रत्युत्तर देतो हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)