इराणकडून तेलाची आयात कमी होणार?

नवी दिल्ली : अमेरिकेच्या दबावापोटी भारत इराणकडून होणारी तेलाची आयात कमी करण्याच्या तयारीत आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने अवघड काळासाठी सज्ज राहण्याची सूचना तेलशुद्धीकरण कंपन्यांना केली आहे. नोव्हेंबरपासून इराणकडून होणाऱया तेलाच्या आयातीत भारत घट करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

अमेरिकेने भारत, चीन समवेत सर्व देशांना इराणकडून कच्च्या तेलाची आयात 4 नोव्हेंबरपर्यंत थांबविण्यास सांगितले आहे. सूचना मान्य न करणाऱया देशांच्या विरोधात आर्थिक निर्बंध लादण्याची धमकी अमेरिकेने दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अमेरिकेने लादलेल्या बंदीला आपण मानत नाही, केवळ संयुक्त राष्ट्राच्या निर्बंधांचे पालन करतो असे भारताने स्पष्ट केले आहे. चीननंतर भारतच इराणकडून सर्वाधिक प्रमाणात कच्च्या तेलाची खरेदी करतो. परंतु अमेरिकेच्या वित्तीय प्रणालीच्या संपर्कात येण्यासाठी भारताला आयातीचे प्रमाण कमी करणे भाग पडू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)