इराक मध्ये एकाच दिवशी तेरा जिहादींना चढवले फासावर

बगदाद – इस्लामिक स्टेटच्या गनिमांचा बदला घेण्यासाठी इराक सरकारने फाशीची शिक्षा झालेल्या इस्लामिक स्टेटच्या कैद्यांपैकी तेरा जणांना आज एकाच दिवशी फासावर लटकावले. इस्लामिक स्टेटच्या गनिमांनी काही नागरीकांचे अपहरण केले होते. त्या आठ नागरीकांची त्यांनी हत्या केल्याचा प्रकार घडल्यानंतर संपुर्ण देशभर अस्वस्थता निर्माण झाली होती. त्या पार्श्‍वभूमीवर इराकचे पंतप्रधान अबादी यांनी फाशीची शिक्षा झालेल्या दहशतवाद्यांना त्वरीत फासावर लटकवण्यात यावे असे आदेश आपल्या प्रशासनाला दिले. त्यानुसार आज एका दिवसांत तेरा दहशतवद्यांना फासावर लटकवण्यात आले आहे.

संपुर्ण इराकमध्ये फाशीची शिक्षा झालेले शेकडो कैदी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आता मृत्यूची टांगती तलवार आहे. इस्लामिक स्टेटच्या गनिमांचे आव्हान मोडून काढण्यास विद्यमान सरकार असमर्थ ठरत असल्याची ओरड सुरू झाल्यानंतर लोकांच्या मनात विश्‍वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी काही तरी ठोस कृती सरकारकडून होंणे अपेक्षित होते. त्याचाच एक भाग म्हणून आता इराक सरकारने शिक्षा झालेल्या दहशतवद्यांना फासावर लटकवण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)