इराकमध्ये इसिसच्या काळातील दोनशे सामुहिक दफन स्थळे आढळली 

इस्लामिक स्टेटकडून हजारो लोकांची कत्तल झाल्याचे उघड 

संयुक्तराष्ट्रे: इराकमधील जो भाग इस्लामिक स्टेटच्या ताब्यात होता त्या ठिकाणी अक्षरश: हजारोंच्या संख्येने लोकांच्या कत्तली करण्यात आल्याची बाब संयुक्तराष्ट्रांच्या मानवाधिकार समितीच्या पहाणीत उघड झाली आहे. इस्लामिक स्टेच्या हैवांनांनी हजारो लोकांच्या कत्तली करून त्यांचे मृतदेह सामुहिक रित्या एकाच ठिकाणी ढीग रचून दफन केल्याचे आढळून आले आहे. अशी एकूण दोनशे सामुहिक दफन स्थळे संयुक्तराष्ट्रांच्या मानवाधिकार समितीला आढळली आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

धर्माच्या नावाने इतका भयंकर नरसंहार करण्यात आल्याचा अलिकडच्या काळातला हा सर्वात भीषण प्रकार आहे. ही सामुहिक दफन स्थळे निनेवेह, किरकुक, सलाहउद्दीन आणि अनबर या परिसरात आढळून आली आहेत. या समितीने अनअर्थींग ऍट्रोसिटीज या नावाने या हत्याकांडांवर प्रकाश टाकणारा एक अहवाल नुकताच प्रकाशित केला आला असून त्यात ही अंगावर शहारे आणणारी माहिती देण्यात आली आहे.

मानवी क्रुरतेची परिसीमाच आम्हाला त्या भागात पहायला मिळाली असल्याचे संयुक्तराष्ट्रांच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याने नमूद केले आहे. जून 2014 ते डिसेंबर 2017 या अवधीत इराक मधील बराच भाग इस्लामिक स्टेटच्या ताब्यात होता. त्याकाळात ही हत्याकांडे झाली आहेत. आजही हजारो कुटुंबे आपल्या बेपत्ता नातेवाईकाच्या शोधासाठी त्या देशात हिंडत आहेत. त्यांचे कुटुंबिय याच सामुहिक दफन स्थळांमध्ये कोठेतरी दफन झाली असावीत असे त्यांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)