इरम हबीब बनणार पहिली काश्‍मिरी मुस्लीम महिला वैमानिक

नवी दिल्ली – तीस वर्षीय इरम हबीब ही वैमानिक बनणारी काश्‍मीरमधली पहिली मुस्लीम महिला ठरणार आहे. पुढील महिन्यात इरम खासगी विमान कंपनीत पायलट म्हणून रूजू होत आहे. काश्‍मीरमधल्या अत्यंत धार्मिक मुस्लीम वातावरणात तरूणीने वैमानिक होणे ही अत्यंत दुर्मिळ बाब असून त्यामुळे इरमची कामगिरी कौतुकास्पद ठरत आहे.

बालपणापासूनच इरमने वैमानिक होण्याचे स्वप्न बघितले होते. यासाठी तिने फॉरेस्ट्री या विषयात डॉक्‍टरेट करण्याची आकांक्षा बाजुला ठेवली व पायलट होणे निवडले. दोन वर्षांपूर्वी तन्वी रैना या काश्‍मिरी पंडित कुटुंबातील मुलीने वैमानिक होत काश्‍मीरमधली पहिली महिला वैमानिक होण्याचा मान मिळवला होता.

तर गेल्या वर्षी आयेषा अझीज या एकवीस वर्षीय तरूणीने भारतातील सगळ्यात तरूण विद्यार्थी वैमानिक ठरण्याचा मान मिळवला होता.

इरमच्या वडिलांचा सरकारी रुग्णालयांना वैद्यकीय उपकरणे पुरवण्याचा व्यवसाय आहे. ज्यावेळी इरम बारावीत होती त्यावेळीच तिने वैमानिक होण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु तिच्या घरच्यांनी यास विरोध केला होता. मात्र तिने सहा वर्ष घरच्यांना पाठिंबा देण्याची गळ घातली व तिला त्यात यश आले.

व्यावसायिक वैमानिकाचा परवाना मिळवण्यासाठी इरम सध्या दिल्लीमध्ये प्रशिक्षण घेत असून वैमानिकाचे प्रशिक्षण तिने दोन वर्षांपूर्वी अमेरिकेतील मयामी इथे घेतलेले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)