इरफान खान पूर्णपणे ठिक, करणार पुनरागमन

इरफान खानच्या फॅन्ससाठी एक खूषखबर आहे. त्याची तब्येत आता एकदम ठिक असून तो लवकरच बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. डायरेक्‍टर शुजीत सरकारच्या ड्रीम प्रोजेक्‍टमधून तो दुसरी इनिंग सुरू करणार आहे, याची माहिती स्वतः शुजीत सरकारनेच दिली आहे. शुजीत सरकार एक बायोपिक करणार आहे, त्यात लीड रोल इरफान खान करणार आहे. यापूर्वी शुजीत सरकारच्या “पिकू’मध्ये इरफानने काम केले होते.

आता क्रांतिकारक उधम सिंग यांच्या जीवनावरील बायोपिकमध्ये इरफान लीड रोल साकारणार आहे. स्वातंत्र्य चळवळीदरम्यान जालियनवाला बागेत बेछुट गोळीबार करणारा पंजाब प्रांताचा ब्रिटीश गव्हर्नर मायकेल ओ’डवायर याला उधम सिंगांनी गोळी घालून संपवले होते. या कथेवर शुजीत सरकार गेल्या 17 – 18 वर्षांपासून काम करत आहे. स्वातंत्र्यापूर्वीचे कथानक असल्याने या सिनेमाची तयारी जरा जास्त करावी लागते आहे.

उधम सिंगांवरील या सिनेमासाठी रणबीर कपूरची निवड झाल्याचे पूर्वी समजले होते. मात्र शुजीत सरकारने ही अफवा असल्याचे स्पष्ट केले. या सिनेमासाठी इरफानच फिट आहे आणि त्याची निवड पक्की झाली आहे. त्याच्या आजारपणाच्याकारणाने त्याच्या निवडीची घोषणा थोडी उशीरा झाली, इतकेच.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)