इरफान खानची इन्स्टाग्रामवर इमोशनल पोस्ट

इरफान खान मेंदूतल्या ट्युमरच्या उपचारांसाठी ब्रिटनला गेला आहे. तिथल्या हॉटेलच्या रूममध्ये बसल्या बसल्या त्याने इन्स्टाग्रामवर एक इमोशनल पोस्ट टाकली आहे. त्याच्या पोस्टमध्ये त्याची स्वतःचीच सावली दिसते आहे. त्या फोटोबरोबर प्रसिद्ध कवी रेनर मारिया रिल्काची “गॉड स्पीक्‍स अस टू इच ऑफ अस..,’ ही एक कविताही इरफानने शेअर केली आहे. गेल्या शुक्रवारी इरफानने आपल्या न्यूरोएंडोक्राइनल ट्युमर झाल्याचे सोशल मिडीयावरच्या एका स्टेटमेंटमध्ये म्हटले होते. त्यानंतर काही दिवस त्याच्या रोगाबाबत उलट सुलट बातम्या येत राहिल्या.

बॉलिवूडमध्ये तर एकदम चिंतेचे वातावरण पसरले होते. कारण श्रीदेवीच्या मृत्यूनंतर काही दिवसातच इरफानच्या आजाराची बातमी आली होती. त्यानंतरच्या पोस्टमध्ये इरफानने आपल्या आजाराची सविस्तर माहिती दिली. आपल्या निकटवर्तीयांच्या शुभेच्छा आणि अजून जगण्याची ईच्छा यामुळे मी सहिसलामत परत येईन. या रोगाचा संबंध मेंदूशी असतोच, असे नाही. ज्यांना याबाबत अधिक माहिती हवी असेल त्यांनी गुगलवर सर्च करावा. आता माझ्या या आजाराबाबत अफवा पसरणार नाहीत, अशी आशा आहे. मी लवकरच परत येईन, असेही इरफानने म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)