इयत्ता तिसरीसाठी आदिवासी बोलीभाषेत पुस्तके

डॉ. किरण कुलकर्णी : भारती विद्यापीठात आदिवासी शाळांच्या स्थितीवर परिषद

पुणे – आदिवासी लोक बऱ्याचशा पोटभाषा बोलत असल्यामुळे एका विशिष्ट पोटभाषेत शिकविणे शिक्षकांना आणि शिकणाऱ्यांनाही फारच कठीण जाते. म्हणून इयत्ता तिसरीसाठी आदिवासी बोलीभाषेत पुस्तके तयार करण्याचे काम सुरू आहे, असे राज्याचे आदिवासी विभागाचे आयुक्‍त डॉ. किरण कुलकर्णी यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारती विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस अँड रिसर्च व दिल्ली येथील जामिया मिला इस्लामिया विद्यापीठाच्या सोशल वर्क विभाग आयोजित “भारतातील आदिवासी आश्रम शाळांची स्थिती – समस्या, आव्हाने आणि संभाव्यता’ या विषयावरील परिषदेचे उद्‌घाटन करताना ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंके, इस्लामिया विद्यापीठाचे कुलसचिव ए. पी. सीदक्‍यू, विभाग प्रमुख प्रा. कुमार सुरेश, संचालक डॉ. बी. टी. लावणी उपस्थित होते.

कुलकर्णी म्हणाले, राज्यात आदिवासी विभागाच्या 500 च्या वर आश्रमशाळा आहेत; परंतु, त्या ठिकाणी विद्यार्थी केवळ पोटार्थी म्हणून येतो. घरी उपाशी राहतो म्हणून निदान आश्रमशाळेत पोटभर अन्न मिळेल या आशेने विद्यार्थी शाळेत येतात. त्यामुळे जेमतेम दहावीपर्यंत मुली शिक्षण घेतात. आदिवासींचा विकास करावयाचा असेल, तर शिक्षणाच्या मूलभूत सोयी उपलब्ध झाल्या पाहिजेत. या करीता शासन नवनवीन उपक्रम राबवत आहे. या बरोबरच मुलांचे आरोग्य, त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा, याकडे लक्ष द्यायला हवे. या भागात दळणवळणाची साधणे आणि पक्‍के रस्ते बांधले पाहिजेत. पाझर तलाव, शेततळी, लघुपाटबंधारे बांधून पिण्याचा आणि शेती सिंचनाचा प्रश्‍न मार्गी लावला पाहिजे. वाड्या-पाड्यावर, हाकेच्या अंतरावर किमान प्राथमिक दवाखाना झाला पाहिजे. आदिवासींच्या सक्षमीकरणासाठी त्यांना मुख्य प्रवाहात आणणे महत्त्वाचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)