इम्रान यांच्या बहिणीला तब्बल 2 हजार 940 कोटी रूपये कर, दंड भरण्याचा आदेश

इस्लामाबाद- पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या भगिनी अलिमा खानूम परदेशातील बेनामी मालमत्तेवरून अडचणीत आल्या आहेत. त्यांना तब्बल 2 हजार 940 कोटी रूपये कर आणि दंड भरण्याचा आदेश पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

पाकिस्तानातील राजकीय क्षेत्राशी संबंधित 44 व्यक्ती बेनामी मालमत्तेवरून न्यायालयाच्या रडारवर आहेत. त्या व्यक्तींच्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) मालमत्ता आहेत. त्यामध्ये खानूम यांचाही समावेश आहे. खानूम यांना आठवडाभरात कर आणि दंडाची रक्कम भरण्यास सांगण्यात आले आहे. आदेशावेळी खानूम या त्यांच्या वकिलासमवेत न्यायालयात उपस्थित होत्या. त्यांनी 2008 मध्ये विकत घेतलेली मालमत्ता 2017 मध्येच विकून टाकल्याचे न्यायालयात सांगितले. बेनामी मालमत्ता प्रकरणावरून न्यायालयाने याआधी संबंधितांना फटकारले होते. मोठ्या संख्येने पाकिस्तानी नागरिक परदेशांत बॅंक खाती सुरू करतात. त्याबाबतची माहिती दिली जात नाही. तसेच, परदेशांतील मालमत्तांचा करही भरला जात नाही, असे न्यायालयाने त्यावेळी म्हटले होते.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)