इम्रान यांचा शपथविधी सोहळा होणार साधेपणाने

परदेशी नेत्यांना निमंत्रण न देण्याचा निर्णय
इस्लामाबाद – पाकिस्तानचे नियोजित पंतप्रधान इम्रान खान यांचा शपथविधी सोहळा साधेपणाने होणार आहे. त्या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण कुठल्याच परदेशी नेत्याला देण्यात येणार नसल्याचे पाकिस्तानी परराष्ट्र खात्याने स्पष्ट केले आहे.

पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) या पक्षाचे प्रमुख असणारे इम्रान 11 ऑगस्टला पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्‍यता आहे. अर्थात, त्या शपथविधी सोहळ्याची निश्‍चित तारीख अजून जाहीर करण्यात आलेली नाही. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध देशांच्या प्रमुखांना शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण पाठवण्याचे सूतोवाच पीटीआयकडून करण्यात आले होते.

-Ads-

मात्र, तो विचार बदलून सोहळा साधेपणानेच आयोजित करण्याचा निर्णय इम्रान आणि त्यांच्या पक्षाने घेतला. आता केवळ इम्रान यांच्या नजीकच्या परदेशी मित्रांनाच निमंत्रण पाठवण्यात येणार असल्याचे समजते. मोदींना निमंत्रण पाठवले आणि ते त्यांनी नाकारले तर पाकिस्तानची नाचक्की होण्याची शक्‍यता होती. त्यातून मोदींसह परदेशी नेत्यांना निमंत्रण पाठवण्याचा विचार बदलण्यात आल्याचे संकेत मिळत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)