इम्रान खान समलैंगिक; पत्नीचा गंभीर आरोप

इस्लामाबाद:  इम्रान खान हे समलिंगी आहेत. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ या पक्षातील अनेक सदस्यांशी त्यांचे शारीरिक संबंध आहेत, असा गंभीर आरोप त्यांची आधीची पत्नी रेहन खान हिने केला आहे. याआधी तिने इम्रान यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते.

रेहम खानचं पुस्तक येत्या काही दिवसांत प्रकाशित होणार आहे. त्याचा काही भाग ऑनलाइन लीक झाला आहे. या पुस्तकात तिनं इम्रान, पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसीम अक्रमसह इतरांवरही अनेक आरोप केले आहेत. पाकिस्तानी मीडियानं दिलेल्या वृत्तानुसार, इम्रान, पाकिस्तानी अभिनेता हमजा अली अब्बासी आणि पक्षातील सदस्य मुराद सईद हे समलिंगी असून, त्यांच्यात शारीरिक संबंध आहेत, असा दावा तिनं पुस्तकात केला आहे.

इम्रान आणि हमजा यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, मुराद सईद यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. रेहम यांनी माझ्याबद्दल आणि इतरांबाबत जे काही लिहिलं आहे, त्यावर बोलण्यासारखं काही नाही. पण त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोण निशाणा साधतंय, हे लक्षात आलंय, असं त्यांनी ट्विटद्वारे स्पष्ट केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)