इम्रान खान यांनी निवडणूक आयोगाकडे मागितली लेखी माफी

मतदानाच्या दिवशी जाहीर केली होती मतपत्रिका
इस्लामाबाद – पाकिस्तानात 25 जुलै रोजी झालेल्या मतदानाच्यावेळी जाहीर स्वरूपात मतदान करून मतपत्रिका उघड केल्याने आचार संहितेचा भंग केल्याचा आरोप असलेले नियोजित पंतप्रधान इम्रान खान यांनी निवडणूक आयोगाची लेखी माफी मागितली आहे. निवडणूक आयोगाने त्यावरील आपला निर्णय राखून ठेवला आहे.

गुप्तपणे मतदान करण्याऐवजी त्यांनी आपली मतपत्रिका खुली केल्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस जारी केली होती. त्यावर इम्रान खान यांनी लेखी माफी सादर करून या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. या आधी इम्रान खान यांच्या वकिलांनी त्यांच्या वतीने निवडणूक आयोगाकडे खुलासा सादर केला होता.

-Ads-

आपल्या अशिलाने मुद्दाम ही कृती केली नव्हती केवळ अनावधानाने त्यांनी ही कृती केली असल्याने ही नोटीस मागे घ्यावी अशी मागणी त्यांच्या वकिलांनी केली होती. पण निवडणूक आयोगाने त्यांच्या वकिलांची ही मागणी फेटाळून लावल्यानंतर स्वता इम्रान खान यांनी हा माफीनामा सादर केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)