इम्रान खान यांनी दर्शवली मोदींशी चर्चा करण्याची तयारी

दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तानी भूमीचा वापर हिताचा नसल्याची उपरती इस्लामाबाद, दि.29 -पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. एवढेच नव्हे तर, पाकिस्तानबाहेरील दहशतवादी कारवायांसाठी स्वदेशी भूमीचा वापर स्वहिताचा नसल्याची उपरतीही त्यांना झाली आहे. इम्रान यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान सरकारने गुरूवारी शंभर दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केला. त्यानिमित्त इम्रान यांनी येथे भारतीय पत्रकारांच्या एका गटाशी संवाद साधला.

पाकिस्तानी जनतेची मानसिकता बदलली आहे. पाकिस्तानी जनतेला भारताबरोबर शांततापूर्ण संबंध ठेवण्याची इच्छा आहे. मोदींबरोबरच्या भेटीने मला आनंदच होईल. त्यांच्याबरोबर कुठल्याही मुद्‌द्‌यावर चर्चा करण्याची माझी तयारी आहे. अर्थात, शांततेसाठीच्या हालचाली एकतर्फी असू शकत नाहीत, असे त्यांनी म्हटले. भारताकडून हालचाली होण्यासाठी आम्ही तेथील पुढील वर्षीच्या निवडणुका होण्याची प्रतीक्षा करू, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, काश्‍मीर मुद्‌द्‌यावर लष्करी मार्गाने तोडगा निघू शकत नाही, अशी पुस्तीही जोडली.

दहशतवादी कारवायांना दिला जाणारा पाठिंबा पाकिस्तान जोपर्यंत थांबवत नाही; तोपर्यंत त्या देशाशी चर्चा होणार नाही, अशी ठाम आणि रास्त भूमिका भारताकडून सातत्याने मांडली जात आहे. त्यामुळे दहशतवादाबाबत इम्रान काहीसा नरमाईचा सूर आळवत असल्याचे दिसून येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)