इम्रान खान यांना संसद सदस्यत्व शपथेसाठी सशर्त अनुमती

पेशावर (पाकिस्तान) – इम्रान खान यांना संसद सदस्यत्वाची शपथ घेण्यास सशर्त अनुमती देण्यात आली आहे. पाकिस्तान निवडणूक आयोगाने त्यांना शपथ घेण्यासाठे सशर्त अनुमती दिली आहे. इम्रान खान यांनी एकूण पाच मतदर संघातून निवडणूक लढवली होती.

पाचपैकी तीन मतदार संघातून इम्रान खान यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. परंतु दोन मतदार संघातील निकाल राखून ठेवण्यात आला आहे. एनए53 ( इस्लामाबाद) मतदाऱ्‌ असंघात इम्रान खान यांने एमाजी पंतप्रधान शाहिद खाकान यांना पराभूत केले होते, तर एनए-131 (लाहोर) मतदार संघात इम्रान खान यांनी ख्वाजा साद रफिक यांना यांना पराभूत केले होते. या दोन मतदार संघांतील निकाल अद्‌याप अधिकृपणे जाहीर करण्यात आलेला नाही.

-Ads-

तीनपैकी एका मतदार संघातील जागेवरून इम्रान खान यांना संसद सदस्यत्वाची शपथ घेता येणार आहे. इम्रान खान यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याचा मामला प्रलंबित असून निवडणूक आयोगाच्या निर्णयावर त्यांची सदस्यता अवलंबून असणार आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून इम्रान खान शपथ घेऊ शकतीला की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
निवडणूक प्रचारा दरम्यान अनुचित भाषा वापरल्याच्या आयोगात जर निवडणूक आयोगाने त्यांना दोषी ठरवले, तर सर्वच जागांवरून त्यांना अयोग्य घोषित केले जाईल. मात्र त्यांच्या पक्षाला मिळालेले मोठे यश आणि सध्याचे राजकीय वातावरणा पाहता केवळ्‌ ताकिद देऊन इम्रान खान यांना सोडण्यात येईल याची शक्‍यता अधिक आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)