इम्रान खान यांच्या शपथविधीचे निमंत्रण आमिर खान, गावस्कर आणि कपिलदेवना

इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये नियोजित पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीच्या समारंभाला बॉलिवूड अभिनेता आमिर खान, माजी क्रिकेटपटू सुनिल गावस्कर आणि कपिल देव यांच्यासह नवज्योत सिंग सिद्धू यांना निमंत्रण देण्यात आले आहे.

इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाने अन्य पक्ष आणि अपक्ष खासदारांबरोबर चर्चेला सुरुवात केली आहे. आघाडीचे सरकार स्थापन करायला लागणार हे निश्‍चित झाल्यामुळेच ही जुळवाजुळव सुरू झाली आहे.
इम्रान खान “सार्क’देशांच्या प्रमुख नेत्यांनाही या शपथविधीसाठी निमंत्रित करणार असल्याचे आगोदर समजले होते. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही नाव होते. मात्र पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ पक्षाकडून ही शक्‍यता फेटाळण्यात आली आहे.

-Ads-

विदेशी नेत्यांना शपथविधीला निमंत्रण पाठवायचे की नाही, याबाबत पक्षाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. विदेशी नेत्यांबाबत प्रसार माध्यमांकडूनच अंदाज वर्तवण्यात येत आहेत असे “पीटीआय’ पक्षाचे प्रवक्‍ते फवाद चौधरी यांनी ट्विटरवर सांगितले. इम्रान खान यांचा शपथविधी 11 ऑगस्ट रोजी होण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)