इम्रान खान यांच्या विधानांतून वेगळा अर्थ

पाकिस्तान कोणत्याही देशाचे युद्ध लढणार नाही – इम्रान खान
इस्लामाबाद – पाकिस्तान यापुढे भविष्यात कोणत्याही देशाचे युद्ध लढणार नाही अशी घोषणा पाकिस्तानचे नवे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली आहे. आपल्या देशाचे विदेश धोरण हे पुर्णपणे राष्ट्रहिताचेच असेल असेल असेही त्यांनी म्हटले आहे.
दहशतवादाच्या विरोधातील युद्धात झालेला विनाश आणि त्यामुळे भोगाव्या लागलेल्या यातनांच्या संबंधात त्यांनी यावेळी सविस्तर भाष्य केले. ते म्हणाले की मी सुरूवातीपासूनच या युद्धाच्या विरोधात आहे.

आम्ही आता कोणत्याही देशाचे युद्ध लढणार नाही असे त्यांनी यावेळी नमूद केले. तथापी त्यांनी यावेळी लष्कराने दहशतवादाच्या विरोधात दिलेल्या लढ्याचे कौतुक केले. आपल्या सेना दलांनी आणि गुप्तचर यंत्रणांनी आपला देश सर्व प्रकारच्या धोक्‍यापासून संरक्षित केला आहे. त्यांनी मनुष्यबळाच्या भांडवलावर अधिक गुंतवणुक करण्याची गरज व्यक्त केली. ते म्हणाले की आपल्या मुलांना शाळेत पाठवून देशात मोठ्या प्रमाणावर रूग्णालयांची उभारणी करण्याची गरज आहे त्याकडे आम्ही लक्ष देणार आहोत.

मदिनेतील राज्यानुसार आपण आपल्या देशातील प्रत्येक क्षेत्रात पारदर्शकता आणि गुणवत्ता आणण्याचा प्रयत्न करू. पाकिस्तानला चांगली भौगोलिक रचना लाभली आहे. आपला देश खाणींनी समृद्ध आहे. आता फक्त आपल्याला प्रामाणिकपणे काम करून देशाला वेगळ्या उंचीवर न्यायचे आहे असे ते म्हणाले. पाकिस्तानी लष्कराचे गुणगान गाताना ते म्हणाले की ही देशातील एकमेव अशी संस्था आहे की जिथे राजकीय हस्तक्षेप चालत नाही. तिथे प्रत्येक निर्णय गुणवत्तेवरच होतो.

पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेल्या या विधानांतून वेगळाच अर्थ ध्वनीत होत आहे. आपण आता कोणत्याच देशासाठी युद्ध लढणार नाही असे त्यांचे म्हणणे म्हणजे अमेरिकेच्या नादी लागून आपल्या देशातील दहशतवादाच्या विरोधात सुरू असलेली कारवाई त्यांना थांबवायची आहे काय अशी शंका व्यक्त केली जात आहे.

दहशतवादाच्या विरोधातील युद्धात देशाचे बरेच नुकसान झाले असल्याचे त्यांनी याला जोडूनच म्हटले आहे त्यावरून ही शंका अधिक गडद झाली आहे. त्यामुळे लष्कराने दहशतवादाच्या विरोधात पाकिस्तानात सुरू केलेल्या मोहीमा यापुढील काळात थांबवून दहशतवाद्यांना मोकळे रान दिले जाईल काय अशी शंका व्यक्त केली जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)