इम्रान खान भाषणादरम्यान पाकिस्तान टीव्हीवर “बेगिंग’ सोशल मीडियावर टवाळी 

पेशावर (पाकिस्तान): पकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या बीजिंगमधील भाषणादरम्यान पीटीव्ही (पाकिस्तान टेलिव्हिजन) च्या स्क्रीनवर “बेगिंग’ अक्षरे दाखवली गेली. या घोडचुकीची सोशल मीडियावर जोरदार टवाळी झाली आहे. अर्थात्‌ चूक लक्षात आल्यानंतर “बेगिंग’ ऐवजी बीजिंग’ अशी दुरुस्ती करण्यात आली. आणि पीटीव्हीने त्याबद्दल माफीही मागितली आहे. पण तोपर्यंत व्हायचे ते नुकसान होऊन गेले होते.

इम्रान खान पंतप्रधान झाल्यानंतर प्रथमच चीनच्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यांच्या बीजिंगमधील भाषणचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह टेलिकास्ट) चालू असताना टीव्हीच्या स्क्रीनवर बीजिंग ऐवजी बेगिंग अशी अक्षरे दाखवली गेली. इम्रान खान चीनमध्ये आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानसाठी मदत मागण्यासाठीच गेलेले असल्यामुळे “बेगिंग़’ या शब्दाला नेटिझन्सनी मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले.

“चीन दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान इम्रान खान यांच्या भाषणाच्या थेट प्रसारणाच्या वेळी मोठी चूक झाली. ती सुमारे 20 सेकंद दाखवली गेले, या चुकीबद्दल आम्हाला खेद वाटत आहे. चुकीबद्दल संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे.’ असे पीटीव्हीने ट्‌विट केले आहे. पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)