इम्रान खानला पाच अनौरस मुले…

त्यातील काही भारतात


त्याच्या माजी पत्नीच गौप्यस्फोट

नवी दिल्ली – पाकिस्तानातील राजकीय नेता बनलेला माजी क्रिकेटपटू इम्रानखान याला पाच अनौरस मुले असून त्यातील काहीं भारतात आहेत असा गौप्यस्फोट त्याची माजी पत्नी रेहम खान हिने केला आहे. तिने एका पुस्तकात इम्रानखान याच्या विषयीची सारी गुप्त माहिती उघड करून खळबळ माजवली आहे.

या पुस्तकात तिने म्हटले आहे की स्वता इम्रानखान यानेच मला ही माहिती दिली. तो म्हणाला की माझे अनेक विवाहित महिलांशी संबंध होते. त्यातून मला पाच मुले झाली आहेत. त्यातील काहीं भारतातील आहेत. ही माहिती तुला कशी कळाली असे आपण त्याला विचारले त्यावेळी तो म्हणाला की या महिलांनीच मला ही माहिती दिली.

आपला विवाह तुटू नये म्हणून त्यांनी त्यांच्याशी आपले असलेले संबंध जाहीर केले नाहीत पण त्यांनी आपल्यापासून झालेल्या संततीची माहिती मला कळवली होती. त्यातील एक मुलगा सध्या 34 वर्षाचा आहे असेही त्याने मला त्यावेळी सांगितले आहे असेही रेहम खान हिने या पुस्तकात नमूद केले आहे.

रेहम खान ही पाकिस्तानातील टीव्ही अँकर होती. तिने आधीच विवाहीत असलेल्या इम्रानखानशी विवाह केला पण तो जेमतेम दहा महिने टिकला. त्यानंतर ते दोघेही विभक्त झाले आहेत. त्यानंतर तिने त्याच्या बरोबरच्या संबंधातील माहिती या पुस्तकात उघड केली आहे. आपल्या वाट्याला जे आले ते दुसऱ्या महिलांच्या वाट्याला येऊ नये या भावनेतून आपण हे पुस्तक लिहीले आहे असे तीने म्हटल आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)