नवी दिल्ली: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची तिसरी बिवी पाकिस्तानी लष्कराची एजंट असल्याचे प्रसिद्ध लेखक तारिक फतह यांनी म्हटले आहे. पाकिस्तानचे नवे सरकार, पाक लष्कराचे धोरण आणि दहशतवाद या विषयांवर ते बोलत होते. या प्रसंगी विचारण्यात आलेल्या प्रश्‍नाना त्यांनी मनमोकळी उत्तरे दिली. पाकिस्तानचे पतप्रधान इम्रान खार आणि लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली.

पाकिस्तान बदलणार नाही, आणि इम्रान खान तर पाकिस्तानला बदलू शकणारच नाही. कारण इम्रान खानच्या हाती काहीही नाही. त्यांच्यावर लष्कराचे पूर्ण नियंत्रण आहे. इम्रान खान यांची तिसरी पत्नी पाक लष्कराची एजंट असल्याने इम्रान खान यांच्या बेडरूमपर्यंत लष्कर पोहचले आहे. असे स्पष्ट करून तारिक फतह पुढे म्हणाले की, संसदीय निवडणुका अगोदरच फिक्‍स झाल्या होत्या. त्यासाठीच लष्कर तैनात करण्यात आले होते. भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही अशी ओरड करणारांना पाकिस्तानात पाठवून द्या, म्हणजे त्यांना कळेल की अभिव्यक्ती स्वातंत्र्य काय असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)