इम्रानखान प्रथमच चीन दौऱ्यावर दाखल 

बिजींग: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे आज प्रथमच चीनच्या दौऱ्यावर दाखल झाले. आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानला बाहेर काढण्यासाठी त्यांनी आपल्या जुन्या मित्र देशाला साद घालायचे ठरवले असून त्या प्रयत्नात ते चीन मध्ये दाखल झाले आहेत. पकिस्तानी पंतप्रधानांनी चीन दौऱ्यावर जाण्याची अलिकडच्या काळातली ही पहिली घटना आहे. त्यांचा हा दौरा चार दिवसांचा आहे. या दौऱ्यात ते चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि पंतप्रधान ली केकीयांग यांच्याशी चर्चा करणार आहेत. चीनच्या वतीने आंतरराष्ट्रीय आयात निर्यात प्रदर्शन शांघायला आयोजित करण्यात आले आहे त्यालाहीं ते भेट देणार आहेत.

पंतप्रधान इम्रान खान यांच्या समवेत विदेश मंत्री शाह मेहमुद कुरेशी, अर्थमंत्री असद उमर, वाणिज्य सल्लागार अब्दुल रज्जाक दाऊद, रेल्वे मंत्री शेख रशिद हेही आहेत. चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या प्रस्तावावर पंतप्रधान इम्रान खान यांनी अलिकडेच नाराजी व्यक्त केली होती. 50 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा हा प्रकल्प आहे. तथापी त्यावरून पाकिस्तान कर्जाच्या सापळ्यात अडकणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आल्याने यातील काही प्रकल्प रद्द करण्याची सुचना पाकिस्तानच्या काही मंत्र्यांनी जाहीरपणे केली आहे. त्या विषयी पंतप्रधान इम्रान खान हे चीनी नेत्यांशी चर्चा करणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आयएमएफ कडून पाकिस्तान कर्ज मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. पण त्यांच्याकडून पाकिस्तानला अपेक्षित प्रमाणात कर्ज मिळण्याची शक्‍यता नसल्याने चीन कडून कर्ज मिळवण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जात आहे. त्याविषयीही इम्रान खान चीनी नेत्यांशी बोलणार असल्याचे सांगितले जाते. इम्रान खान यांनी अलिकडेच सौदी अरेबियाकडून तीन अब्ज अमेरिकन डॉलर्सचे कर्ज मंजुर करून आणले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)