इमेल प्रकरणात ट्रम्प यांनी केले आपल्या कन्येचे समर्थन 

वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हान्का हिने आपला खासगी इमेल सरकारी कामासाठी वापरल्याने सध्या अमेरिकेत वादंग निर्माण झाले आहे. पण या प्रकरणात ट्रम्प यांनी आपल्या कन्येचे समर्थन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की या इमेल मध्ये कोणतीही गुप्त माहिती नव्हती. त्यामुळे त्याचा वापर करण्याने काहीही चुकीचे झालेले नाही. हे ईमेल रद्दही करण्यात आलेले नाहींत.

यातील विशेष बाब अशी की 2016 सालच्या अध्यक्षीय निवडणूकीच्यावेळी त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी हिलरी क्‍लिंटन यांच्यावर सरकारी कामांसाठी आपल्या खासगी ईमेलचा वापर केल्याच्या कारणावरून सडकून टीका केली होती. या संबंधात वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की अमेरिकन अध्यक्षांची सल्लागार म्हणून काम करताना इव्हान्का यांनी सरकारी अधिकाऱ्यांना सरकारी कामांविषयीचे शेकडो इमेल्स पाठवले आहेत.

-Ads-

सरकारी रेकार्ड नोंदीच्या नियमांचा हा भंग आहे असेही वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे. त्यावर ट्रम्प यांचा खुलासा असा की इव्हान्का यांनी पाठवलेल्या कोणत्याही ईमेल पत्रांमध्ये सरकारी गुप्त माहितीचा समावेश नाही. जसा तो हिलरी क्‍लिंटन यांच्या ईमेल मध्ये होता. हिलरींनी नंतर 33 हजार ईमेल नष्ट केले. माझ्या मुलीने तसे केलेले नाही. तिला काहीही लपवायचे नाही. इव्हानकाने जे केले आहे ते सर्व अध्यक्षीय कामकाजाच्या अधिकृत रेकार्डवर उपलब्ध आहे. दरम्यान अमेरिकन संसदेच्या एका समितीने इव्हान्का यांनी पाठवलेल्या ईमेलच्या चौकशीचे काम सुरू केले आहे. इव्हान्का यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे की नाही हे या चौकशीनंतरच सिद्ध होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)