इमरान हाश्‍मी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला 

इमरान हाश्‍मी लवकरच “चीट इंडिया’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या टिझरला सोशल मीडियावर प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहे. हा चित्रपट देशांतील शिक्षण व्यवस्था, तसेच शिक्षणाच्या बाजारीकरणाचे प्रश्नांवर भाष्य करणारा आहे. या चित्रपटाला “नगल में अकल है’ अशी टॅग लाईन देण्यात आली असून देशातील सर्वाधिक नफा देणारा व्यवसाय म्हणून शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचारावर बोट ठेवले आहे.

या टीझरमध्ये अभिनेता इमरानच्या डायलॉगने सुरु होते. “ऊपरवाला दुआ कबुल करता है, मैं सिर्फ कॅश लेता हूं,’ तसेच या टिझरमध्ये शिक्षण व्यवस्थेचे वास्तव दिसून येते. यात इमरान हा राकेश सिंहची भूमिका साकारणार आहे. जो डोनेशन घेवून विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देत असतो. या चित्रपटातून अभिनेत्री श्रेया धनवंतरी बॉलीवूडमध्ये डेब्यू करत आहे.

-Ads-

देशांतील शिक्षणाच्या मुद्दयांवर आधारित हा चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित होतो आहे. चित्रपटाची निर्मिती टी-सीरिज, अतुल कासबेकर व तनुज गर्गच्या एलिप्सिस एण्टरटेन्मेंट आणि इमरान हाश्‍मी करतो आहे. इमरान हाश्‍मी आणि श्रेया धनवंतरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)