“इन्स्टा’ अकाउंट “हॅक’ करुन अश्‍लिल फोटो टाकले

पिंपरी – चिंचवड येथील एका 19 वर्षीय मुलीचे इन्स्टाग्राम अकाउंट “हॅक’ करुन अश्‍लिल फोटो टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी रोहीत राजेंद्र पाटील (वय-28, रा. थळ, अलिबाग) या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी व आरोपी हे एकाच गावातील रहिवासी आहेत. जानेवारीपासून पीडिता ही चिंचवड येथे शिक्षण घेण्यासाठी आली आहे. आरोपी हा तिचा इन्स्टाग्रामवर देखील मित्र आहे. त्यानेतिचे अकाउंट हॅक करुन त्यावर पीडितेचा चेहरा वापरून अश्‍लिल फोटो टाकले. त्यानुसार रोहीत याच्यावर विनयभंग व मुलीची बदनामी करणे, सोशल मीडियावर अश्‍लिल मजकूर टाकल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)