इन्स्टाग्रामवर प्रेम; व्हॉटस्‌ अॅपवर नकार

नैराश्‍यातून तरुणीची आत्महत्या : चतु:शृंगी हद्दीतील घटनेने खळबळ

पुणे – इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर प्रेम जुळल्यानंतर काही दिवसांतच व्हॉटस अॅपवर नकार मिळाल्याने एका तरुणीने नैराश्‍यातून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना चतु:शृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हनुमाननगर येथील लक्ष्मी सोसायटीमध्ये घडली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सेजल विजय पावसे (20) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. तर तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सांगली येथे रहाणाऱ्या ऋषि नावाच्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तरुणीच्या आईने फिर्याद दिली आहे.
सेजलची काही दिवसांपूर्वीच ऋषी बरोबर इन्स्टग्रामवर ओळख झाली होती. यानंतर त्या दोघांनी एकमेकांचे व्हॉटस्‌ अॅप नंबर शेअर केले. दोघांचे व्हॉटस्‌ अॅपवर नेहमी चॅटिंग होत असे. ऋषी एकदा सांगलीवरुन सेजलला भेटण्यास पुण्यातही आला होता. दरम्यान, या दोघांमध्ये बोलणे होत असल्याची माहिती सेजलच्या आईला मिळाली होती. हे ऋषीला समजल्यावर तो सेजलबरोबर बोलणे टाळत होता. यानंतर त्याने तिच्यापासून दूर रहाण्यास सुरूवात केली. यामुळे सेजल निराश झाली होती. त्यातच तिने राहत्या घरी आत्महत्या केली. सेजल ही सिंबायोसिस महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तर, ऋषी याचा सांगलीमध्ये व्यवसाय आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनूसार ऋषी याने सेजलची पुण्यात येऊन भेट घेतल्यावर त्याने व्हॉटस्‌ अॅपवर तिला “आपल्यामध्ये आता कोणतेही नाते राहिले नाही. तू मला विसरून जा. माझ्या व्यवसायामुळे मला खूप काम असते. मी तुला वेळ देऊ शकत नाही,’ असा मेसेज पाठवला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)