इन्फोसिस व टाटा मोटर्स कंपन्यांच्या शेअरच्या भावात घसरण 

सलग आठव्या दिवशी मुख्य निर्देशांकांत भरीव वाढ, मध्यपूर्वेतील घडामोडीचा गुंतवणूकदारावर अल्प परिणाम 
मुंबई – रुपयाच्या मूल्यात मोठ्या प्रमाणात घट होऊनही इन्फोसिस कंपनीच्या चौथ्या तिमाहीच्या नफ्यात मोठी घट झाली आहे. त्याचबरोबर कंपनीने आगामी काळात नफा आणि महसूल कमी प्रमाणात वाढणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आज शेअर बाजारात इन्फोसिस कंपनीचे शेअर कोसळले. त्याचबरोबर जग्वार लॅण्ड रोव्हर कंपनी नोकर कपात करणार असल्याच्या वृत्तामुळे टाटा मोटर्सच्या शेअरच्या भावात घट झाल्याचे दिसून आहे. भारतीय शेअरबाजारात सकाळी विक्रीचे वातावरण होते. मात्र नंतर खरेदी झाली आणि निर्देशांक शुक्रवारच्या तुलनेत काही प्रमाणात वाढू शकले. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 112 अंकानी वाढून 34305 अंकावर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 47 अंकानी वाढून 10528 अंकावर बंद झाला. गेल्या सात दिवसांत सेन्सेक्‍स 1173 अंकानी वाढला आहे.

अमेरिका आणि तिच्या मित्र राष्ट्रांनी सीरियावर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. त्यामुळे मध्य पूर्वेतील वातावरणात तणाव आहे या कारणामुळे जागतिक बाजारात सावध वातावरण आहे. तसेच वातावरण भारतीय शेअरबाजारात असल्यामुळे शेअर बाजारात सकाळपासून खरेदी विक्रीच्या लाटा येत होत्या. मध्य पूर्वेतील हल्ल्यानंतर भारतीय शेअरबाजारात फार नकारात्मक प्रतिक्रिया उमटली नसली तरी वातावरण सावध आहे. गेल्या आठवड्यात किरकोळ महागाई कमी झाल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. त्याचबरोबर घाऊक महागाई कमी झाल्याची आकडेवारी आज जाहीर झाली. त्याचबरोबर औद्योगिक उत्पादन वाढले आहे. आता बऱ्याच संस्थांनी या वर्षी पाऊस चांगला पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे गुंतवणूकदार अशावादी असल्याचे वातावरण बाजारात आहे.

जग्वार लॅण्ड रोव्हर कंपनीने सांगितले की, जागतिक बाजारतीाल एकूण मागणी पाहता उत्पादनात काही प्रमाणात कपात करावी लागणार आहे. त्यामुळे 1000 लोकांना कमी केले जाण्याची शक्‍यता आहे. या घडामोडीचा आज टाटा मोटर्सच्या शेअरवर बराच परिणाम झाला. आज बाजार बंद होतांना या कंपनीचा शेअर शुक्रवारच्या तुलनेत 5 टक्‍क्‍यांनी कमी झाला होता. त्यामुळे कंपनीच्या बाजार मूल्यात एकाच दिवसात 5110 कोटी रुपयाची घट झाली.
इन्फोसिस कंपनीने शुक्रवारी चौथ्या तिमाहीचा ताळेबंद जाहीर केला. त्यात नफा फारसा वाढलेला नाही. तसेच आगामी वर्षात महसूल 6 ते 9 टक्‍क्‍यांनी वाढेल तर कार्यचालन नफा 22 ते 24 टक्‍क्‍यांनी वाढेल असे म्हटले आहे. या आकडेवारीवर असमाधानी असलेल्या गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीमुळे या कंपनीच्या शेअरच्या भावात 3 टक्‍क्‍यांनी घट झाल्याचे दिसून आले. त्यामुळे कंपनीचे बाजार मुल्य एका दिवसांत 8 हजार कोटी रुपयानी कमी झाले आहे. सकाळी हा शेअर 6 टक्‍क्‍यांनी सुधारला होता मात्र त्यात थोडी सुधारणा झाल्याचे दिसून आले.
सध्या निर्देशांक उच्च पातळीवर आहे, त्याचबरोबर जागतिक वातावरणात संदिग्धता असल्यामुळे गुंतवणूकदार सावध राहतील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)