इन्फोसिसचे मुख्य वित्तीय अधिकारी रंगनाथ यांचा राजीनामा 

बंगळूरु: इन्फोसिसचे मुख्य वित्तीय अधिकारी एमडी रंगनाथ यांनी राजीनामा दिला आहे. इन्फोसिसने शनिवारी सकाळी रंगनाथ यांनी राजीनामा दिल्याचे जाहीर केले. इन्फोसिस ही माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतातील दुसरी मोठी कंपनी आहे. मागच्या 18 वर्षांपासून रंगनाथ इन्फोसिसमध्ये आहेत.
राजीव बन्सल यांनी कंपनी सोडल्यानंतर 2015 साली त्यांनी मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून जबाबदारी संभाळली होती. 16 नोव्हेंबर 2018 पर्यंत रंगनाथ मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून काम संभाळतील असे इन्फोसिसकडून सांगण्यात आले आहे. या राजीनाम्यामुळे कंपनीचे न भरून येणारे नुकसान झाले आहे, असे इन्फोसिसचे सहसंस्थापक एन. आर. नारायणमूर्ती यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की, रंगनाथ हे भारतातील उत्तम वित्तीय अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. अशा व्यक्‍ती दुर्मिळ असतात. भागधारक, ग्राहक, कर्मचाऱ्यांची आकांक्षा, फायनान्स, गुंतवणूक, सुशासन आणि कायदा याचे त्यांना उत्तम ज्ञान होते. नैतिक दृष्टिकोनातून व्यवसाय केल्यास चांगला समाज कसा उभा राहतो हे त्यांना ठाऊक होते. कठणि काळात ते जात असल्याने कंपनीचे न भरून येणारे नुकसान झाले आहे असे नारायणमूर्ती यांनी म्हटले आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)