इन्फोसिसचे नावीन्यासाठी पुरस्कार 

बंगळुरू: इन्फोसिस फाउंडेशनने भारतातील सामाजिक इनोव्हेशनला प्रेरित करण्यासाठी आरोहण सोशल इनोव्हेशन पुरस्कार सुरू केले असल्याची माहिती इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती सुधा मूर्ती यानी दिली. सामाजिक क्षेत्रातील नवकल्पनांचा वेग वाढवणे आणि त्यातून पुढे आलेल्या उपाययोजनांचा विस्तार करण्यासाठी एक मंच उपलब्ध करून देणे, हे या पुरस्कारांमागचे उद्दिष्ट आहे.
समाजासाठी सद्‌हेतूंनी कार्यरत असलेल्या व्यक्ती आणि सेवाभावी संस्थाना मदत करणे हाच आमचा प्रयत्न आहे. या प्रयत्नांचा भाग म्हणून आम्ही यावर्षी एकूण दीड कोटी रुपये बाजूला काढून ठेवत आहोत. आरोग्य, ग्रामीण विकास, निराधारांची काळजी, महिला सुरक्षितता आणि सक्षमीकरण, शिक्षण आणि क्रीडा, शाश्‍वत किंवा टिकाऊ उपाययोजना या सहा विभागांसाठी 15 ऑक्‍टोबर ते 31 डिसेंबरदरम्यान अर्ज स्वीकारले जातील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)