इनोव्हेशनमध्येच सक्‍सेस : गौरव अत्तरदे

“आपण झोपेत पाहतो, ते खरं स्वप्न नसतं, पण आपली जे झोप उडवते ते खरं स्वप्न असतं” – ए. पी. जे. कलाम

या उक्‍तीवर तंतोतंत विश्‍वास ठेवून गौरव अत्तरदे यांनी त्यांची व्यावसायिक वाटचाल सुरू केली. मुळात इलेक्‍ट्रॉनिक्‍स इंजिनियर असलेले गौरव यांनी कधीही नोकरीचा विचार ही केला नाही; परंतु इंजिनिअरिंग करीत असतानाच त्यांनी ऑटो वर्कशॉप चालविणाऱ्या एका मित्रासोबत ट्रॅव्हल कंपनीची सुरुवात केली. प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड, पॅक इंडिया लिमिटेड, यासारख्या कंपन्यांना सर्व्हिसेस देऊन व्यवसायाचे प्रत्यक्ष धडे हे व्यवसाय करूनच घेतले. त्यावेळी त्यांना शब्द, वेळ आणि पैसे यांची किंमत कशी करायची हे शिकायला मिळालं.

2009 मध्ये त्यांनी जीआरडी इंफ्राप्रोजेक्‍टस प्रा. लि. या कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. वाकड, बाणेर, बालेवाडी यासारख्या विकसनशील भागांत प्रकल्प पूर्ण करून त्यांनी सर्व्हिसड्‌ अपार्टमेंट्‌स (हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस), Warehouse डेव्हलपमेंट अँड सर्व्हिसेस या सारख्या संलग्न प्रकारांमध्ये व्यवसायवृद्धी केली. येणाऱ्या काळात गौरव अत्तरदे यांनी construction डेव्हलपमेंट या व्यवसायाचे मानांकन वाढवून समाजासमोर या व्यावसायिकांबद्दल असलेला दृष्टिकोन बदलवून रिअल इस्टेट या व्यवसायाला industry दर्जा मिळावा याकरिता विशेष प्रयत्न करण्याचे ठरविले आहे. याकरिता कुठलेही घर अथवा ऑफिस विकताना विकत घेणाऱ्याची मानसिकता, आर्थिक ज्ञान, कौटुंबिक गरज, भविष्यातील सामाजिक बांधिलकी, तसेच जीवनातील ध्येय इत्यादी गोष्टींचा सविस्तर विचार करूनच त्याला आपले प्रॉडक्‍ट घेण्याविषयी प्रोत्साहन दिले पाहिजे. केवळ आपला sale व्हावा याकरिता घर/ऑफिस विकणे, हे म्हणजे केवळ आपल्या स्वार्थासाठी व्यवसाय करण्यासारखे आहे. तसेच कुठलाही प्रकल्प साकारताना त्याच्याशी निगडित असणारे जमीनमालक, इस्टेट कन्स्ल्टंट्‌स, लॅन्ड सर्वेअर्स आणि आर्किटेक्‍टस्‌, ऍडव्होकेट्‌स, चार्टर्ड अकाउंटंट्‌स यांचाही दृष्टिकोन व्यावसायिकतेसोबत सामाजिक बांधिलकी जपणारा असला तर कुठला ही प्रकल्प हा “रिअल टू सर्व्हिस सोसायटी’ असा म्हटलं जाऊ शकते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

व्यवसायातही सबका साथ सबका विकास
गौरव अत्तरदे कुठलाही प्रकल्प सुरू करण्याच्या आधी वरीलप्रमाणे सर्व कन्सल्टंट्‌स, तसेच जीआरडी (GRD) इंफ्राप्रोजेक्‍ट्‌समध्ये काम करणारा कुठलाही सहकर्मी या सर्वांकरिता त्यांच्या गरजेनुसार व प्राधान्यानुसार प्रकल्पात गुंतवणूक करण्याची मुभा अथवा संधी देतात. यातूनच “सबका साथ सबका विकास’ सहज साध्य होते.

निढळ वाटचाल
बांधकाम क्षेत्रात 2016 नंतर नोटबंदी, GST असे मोठे बदल घडून आल्यामुळे मोठमोठे व्यावसायिक हादरले आणि एकंदरच घरांचा पुरवठा आणि मागणी यांचे सूत्र पूर्णपणे विस्कटले. या काळात भल्याभल्यांना निभावून नेणे सोपे नव्हते; परंतु अत्तरदे यांनी आपल्या ध्येयाविषयी तुमच्या हृदयात उत्कट निष्ठा असली पाहिजे, ही निष्ठा मेघातून पडलेल्या पाण्यावाचून दुसरे कोणतेही पाणी न पिणाऱ्या चातकाप्रमाणेच असली पाहिजे (स्वामी विवेकानंद) या वाक्‍याप्रमाणे आपली निढळ वाटचाल चालू ठेवली.

ग्राहकाभिमुख उद्योजक
अत्तरदे यांनी येणाऱ्या सर्व प्रकल्पांमध्ये सॉईल टेस्टिंगच्या निकषांपासून ते प्रकल्पांकरिता मिळालेल्या सर्व प्रकारच्या परवानग्या, प्रकल्प उभा असलेल्या जमिनीची 1930 पासूनचे महसूल कागदपत्रे, प्रकल्पाकरिता वापरलेली साधने तसेच वॉटरप्रूफिंग इत्यादीची वॉरंटी व इतर विस्तृत माहिती ग्राहकापर्यंत चोख पोहोचवलीच पाहिजे, याची दक्षता घेण्याचा पण घेतला आहे.
गौरव अत्तरदे यांच्या मते, रिअल इस्टेट या क्षेत्रामध्ये बहुतांश जागामालक हे व्यवसायाविषयी असणाऱ्या सखोल ज्ञानाअभावी आपली जमीन विकतात; परंतु अशा सर्व जागामालकांनी या क्षेत्रातील सर्व बारकावे अभ्यासून आपल्या जमिनीचे उत्तम विकसन करून तसेच याबद्दलचे सखोल ज्ञान आपल्या पुढील पिढ्यांना देऊन विकासाची अखंडित शृंखला मजबूत करावी.

आगळीवेगळी संकल्पना
गौरव अत्तरदे यांना प्रखरतेने वाटते की, व्यवसाय सगळेच करू शकतात; परंतु इनोवेटिव्ह विचारसरणी ठेऊन व्यवसाय करणारे व्यावसायिकच पुढे जाऊ शकतात. आपल्या देशात पारंपरिक पद्धतीनुसार, गुंतवणूक ही सोनं वा स्थावर मालमत्ता यातच करण्याची प्रथा आहे आणि त्यातूनच उतारवयातील सिक्‍युरिटीची तरतूद लोक करतात, परंतु आजकाल घरांच्या आकाशाला भिडलेल्या किमतींमुळे सामान्य नागरिकाला स्वतःचे घर आहे; परंतु 5-10 लाख अशा रकमांची गुंतवणूक करावीशी वाटणाऱ्या लोकांना फारसे पर्याय स्थावर मालमत्तेत उपलब्ध नसतात. यावर तोडगा म्हणून अत्तरदे यांनी “Direct Project Participation for Common Man” या धर्तीवर नामांकित ऑडिटर्ससह नवीन संकल्पना मांडण्याचे ठरविले आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून गृहनिर्माण व्यवसाय कशा पद्धतीने पारदर्शक आणि सहज पोहोचण्याजोगा कसा होईल यावर भर देता येईल.

मदतीसाठी नेहमीच तत्पर
गौरव अत्तरदे आणि त्यांची कंपनी यांचा संपूर्ण फोकस हा hm skill development इन रिअल इस्टेट इंडस्ट्री आणि या क्षेत्रात येणाऱ्या नव उद्योजकांना प्रोत्साहन आणि उचित मार्गदर्शनावर असतो. रिअल इस्टेट व तत्सबंधी कुठल्याही प्रकारच्या सल्लामसलत किंवा चर्चेसाठी श्री. गौरव अत्तरदे नेहमीच तत्पर असतात. त्यांचा उत्साह आणि उमेद ही त्यांच्या खूपशा सहकर्मींसाठी प्रोत्साहनदायक आहे.

त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी:
info@grdinfraprojects.com अथवा 020-46769909 आहे.
गौरव अत्तरदे यांना सतत प्रोत्साहित करणारे वाक्‍य हे सुप्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांनी सांगितले आहे. लवकर जायचे असेल तर एकट्याने जा आणि दूरवर जायचे असेल तर एकत्र जा.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)