इनामगाव येथे रंगला कुस्त्याचा आखाडा

मांडवगण फराटा – राज्यभर चितपट कुस्त्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या इनामगाव (ता. शिरूर) येथील आखाड्यात मल्लांनी केलेल्या नेत्रदीपक खेळांनी कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
इनामगाव (ता. शिरूर) येथे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त कुस्तीच्या आखाड्याचे नियोजन करण्यात आले होते. या आखाड्यात शिरुर, श्रीगोंदा, दौंड, नगर, पुणे, कोल्हापूर आदी ठिकाणांहून सुमारे 300च्यावर मल्लांनी सहभाग घेतला होता. यावेळी मल्लांनी कुस्त्या चितपट करत कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. यावेळी ग्रामस्थांकडून रोख बक्षिसे देण्यात आली. इनामगावचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त सोमवारी (दि. 23) पहाटे श्रींचा अभिषेक करण्यात आला व त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. दिवसभर अनेकांनी मुक्तदर्शनाचा लाभ घेतला. सायंकाळी आंबिल, शेरणी वाटप व नवस फेडण्याचा कार्यक्रम झाला. तर दारुगोळ्याची आतषबाजी करीत छबिना मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर प्रसिद्ध रघुवीर खेडकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम पार पडला. मंगळवारी (दि. 24) सकाळी हजेरी व रात्री पुन्हा लोकनाट्याचा कार्यक्रम शांततेत पार पडला. यात्रा काळात गैरसोय होऊ म्हणून सरपंच मंगलताई म्हस्के, उपसरपंच शिवाजी मचाले यांसह सर्व ग्रामपंचायत सदस्य, यात्रा कमिटीने चांगले नियोजन केले होते. मंदिरावर विद्युत रोषणाई केल्याने मंदिर परिसर फुलून गेला होता. तर ग्रामस्थांच्या वतीने शुद्ध पाण्याची भाविकांना व्यवस्था करण्यात आली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)