इनरव्हील क्‍लबचे दोन दिवसीय व्यक्‍तिमत्त्व विकास शिबीर उत्साहात

कराड – सर्वसामान्य मुले उन्हाळी शिबीर किंवा हिवाळी शिबीर यामध्ये सहभाग घेतात. परंतु आपल्या समाजामधील काही घटक असे आहेत की त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्या मुलांना अशा शिबिरांचा लाभ घेता येत नाही. याचाच विचार करुन येथील इनरव्हील क्‍लबच्या वतीने श्री संत तुकाराम हायस्कूल मधील 50 गरजू विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसांचे सर्वांगिण व्यक्‍तिमत्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिराचे उद्‌घाटन रोटरी क्‍लबचे अध्यक्ष डॉ. राहूल फासे यांच्या हस्ते व मुख्याध्यापक सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. शिबिराच्या पहिल्या दिवशी राहुल पुरोहित (हस्ताक्षर), गणेश कोळी (शिक्षणाचे महत्व), अमोल पालेकर (मैदानी खेळ) तसेच दुसऱ्या दिवशी प्रीती चिटणीस(योगासने), श्रीमती अनघा बर्डे(रोटरी युथ लिडरशिप), डॉ. मनोज जोशी (मोफत आरोग्य तपासणी), शितल शहा(अन्न व पोषक आहार), नम्रता कंटक(संभाषण कौशल्य) व सुप्रभा पुरोहित (हस्तकला) आदींनी मार्गदर्शन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना शिबिराचे किट, टोपी, दोन दिवस नाश्‍ता व दुपाराचे जेवणही देण्यात आले. शिबिराच्या समारोपप्रसंगी रोटरी क्‍लबचे रणजित शेवाळे उपस्थित होते. शेवाळे व इनरव्हील क्‍लबच्या अध्यक्षा अलका गोखले यांच्या हस्ते शिबिरातील सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शितल शहा यांनी केले. तर आभार सचिव रुपाली डांगे यांनी मानले. याप्रसंगी इनरव्हील क्‍लबचे सर्व सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)