“इनरटेक’ला जिल्हा स्तरीय उत्कृष्ट लघू उद्योगाचा पुरस्कार

पिरंगुट – येथील इनरटेक यूपीएस कंपनीला महाराष्ट्‌ शासनाच्या उद्योग विभागातर्फे दिला जाणारा 2017 चा जिल्हा स्तरीय उत्कृष्ठ लघु उद्योगाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात पाकलमंत्री गिरीश बापट व जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. कंपनीचे संचालक विजय देशपांडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोरराम, पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी. टी.डेकाटे, पुरस्कार समितीचे सदस्य उद्योजक गोविंद पानसरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. इनरटेक कंपनी ही आयएसओ 9000-15000 मानांकन प्राप्त कंपनी असून या कंपनीची स्थापना 1997 साली पिरंगुट इथे करण्यात आली. अपारंपरिक स्रोतांपासून वीज तयार करणे आणि वीज वाचवणे हाच इनरटेक कंपनी चा उद्देश आहे. कंपनीने हायब्रीड सोलर पीसीयू बनवण्याचे नवीन तंत्रज्ञान विकसित केले असून 2012 पासून कंपनीच्या हायब्रीड पीसीयूला एमएनआरईचे मानांकन मिळालेले आहे, तर 2013 पासून दर महिन्याला 500 किलो वॅट पेक्षा जास्त सौर ऊर्जा इनरटेक च्या पीसीयू पासून तयार होते. अशी माहिती कंपनी चे संचालक विजय देशपांडे यांनी दिली


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)