इथेनॉलचा वापर वाढवून इंधन दरवाढ आटोक्‍यात आणणे शक्‍य : गडकरी

रायपुर: आपल्या देशाचा इंधन आयातीवरील खर्च वर्षाला आठ लाख कोटी रूपये इतका आहे. सध्या डॉलर्सच्या किंमती वाढत आहेत त्यामुळे या आयातवरील खर्च वाढणार असून त्यावर उपाय म्हणून जैव इंधनाचा वापर वाढवण्याची गरज आहे असे आवाहन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.

ते म्हणाले की परिवहन मंत्रालयातर्फे इथेनॉल निर्मीतीचे पाच प्रकल्प सुरू केले जात असून त्यातून मिळणाऱ्या इंधनाचा वापर आपण वाढवला तर पेट्रोलची किंमत 55 रूपये आणि डिझेलची किंमत 50 रूपये इतकी करता येणे शक्‍य आहे. इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळून वापरण्याचे प्रमाण वाढले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की सरकारतर्फे जे प्लान्ट सुरू केले जाणार आहेत त्यात गहु, तांदुळाच्या पेंढ्या, कचरा इत्यादींपासून इथेनॉलची निर्मीती करता येईल. जटरोफा सारख्या वनस्पतींपासूनही जैव इंधन मोठ्या प्रमाणावर देशात तयार करता येणे शक्‍य आहे. इथेनॉल, मिथेनॉल, जैव इंधन आणि सीएनजीच्या वापरातून आपल्याला पेट्रोल आणि डिझेलवरील अवलंबीत्व कमी करता येईल आणि तसे झाले तर या इंधनाच्या किंमतीही आटोक्‍यात आणता येतील असे ते म्हणाले. जैव किंवा पर्यायी इंधनावर चालणारी सर्व वाहने परवाने मुक्त करण्याचा निर्णय सरकारने या आधीच घेतला आहे असेही त्यांनी सांगितले.

आता जैव इंधनावर विमानेही चालवता येऊ शकतात असे सिद्ध झाले आहे त्यामुळे त्याचा अधिकाधिक वापर करणे हाच पर्याय लोकांपुढे उभा आहे असे ते म्हणाले. गडकरी यांच्या हस्ते छत्तीसगड मधील 4251 कोटी रूपये खर्चाच्या आठ प्रकल्पांचे काम सुरू झाले त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की आपण केंद्रातील एकमेव असे मंत्री आहोत की आपल्याला कामांसाठी पैशाची अजिबात कमतरता नाही आपण आत्ता पर्यंत 40 लाख कोटी रूपये खर्चाच्या प्रकल्पांची कामे सुरू केली आहेत अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)