इतिहासाशी प्रतारणाच!

पत्रसंवाद

अगोदर “बाजीराव मस्तानी’, मग “पद्मावती ऊर्फ पद्मावत’ या दोन विवादित चित्रपटानंतर आता झाशीच्या राणीवर “मणिकर्णिका’ या चित्रपटाचे शूटींग सुरू झाले आहे. पहिल्या दोन चित्रपटांचे निर्माते-दिग्दर्शक आहेत संजय लीला भंसाळी- ज्यांच्या पूर्ण नावापासूनच विवाद सुरू होतो, सिनेक्षेत्रात उघडे-वागडे, “कला’ या गोंडस नावाखाली खपवून घेतले जात असेल व ते पाहणारे लाखो आंबटशोकीन असतीलही! पण प्रत्येक देशाचे काही मानबिंदू असतात. त्यांचा श्रद्धा-निष्ठांशी संबंध असतो. त्यांच्याशी खेळून इतिहासाशी प्रतारणा करणारे कलावान व विरोध करणआरे “असहिष्णु’? येथे कॉंग्रेसवाले, डावे चुप्प, ऍवॉर्ड वापसीवाले चूप! आणि याला लोकशाही म्हणतात? जावेद-सलमान सिनेमा-दिग्दर्शकाच्या बाजूने, या गोष्टी गोंडस देखाव्यामागील कडवे सत्य उघडे करतात, मणिकर्णिका सिनेमातही त्या राणीचे एका इंग्रज अधिकाऱ्याबरोबर प्रेमसंबंध दाखविल्यासंबंधी वृत्त आहे, जे संतापजनकच आहे!

पैसा आणि प्रसिद्धीसाठी येथील एक वर्ग कितीही हीन व खालच्या थराला जायला तयार असतो, परंतु ते आक्षेपार्हच आहे व असले पाहिजे! पद्मावती राणीने खिलजीसारख्या लंपट आक्रमकासमोर झुकण्यापेक्षा मृत्यूला कवटाळणे पसंत केले; मात्र अनेक राजांनी आपल्या मुली मुस्लिम राज्यकर्त्यांना देण्यात धन्यता मानली होती! परकीय आक्रमणाचे वेळी तत्कालीन राजे, दूरदर्शीपणे एकत्र आले असते, तर इतिहास काही वेगळाच झाला असता. रजपूत, मराठा, शीख सर्वजण शूर आहेत व होते, म. गांधी बोलले तसे (हिंदू) भेकड कधीही नव्हते. पण या देशाची अस्मिता व संस्कृती वाचविण्यासाठी प्रसंगी सर्वजण एकत्र आले नाहीत, हे कटु सत्य आहे.

– श्‍यामसुंदर गंधे, पुणे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)