इतिहासाच्या पाऊलखुणांना उजाळा

पवनानगर – शेकडो वर्षांपासून भक्‍कमपणे उभे असलेले गड-किल्ले इतिहासाचे खरे साक्षीदार मानले जातात. याच गड-किल्ल्यांवर जाऊन इतिहासाच्या पाऊलखुणांना उजाळा देण्याची मोहीम शिवराष्ट्र हायकर्स महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. इतिहासाची प्रत्यक्ष अनुभूती घेण्यासाठी शिवराष्ट्र हायकर्स महाराष्ट्रच्या वतीने आयोजित गडकोट मोहिमेला तिकोणा किल्यापासून सुरुवात झाली. या मोहिमेत खासदार राजू शेट्टी, जळगावचे तहसीलदार मनोज देशमुख, परभणीचे जिल्हा उपनिबंधक महादेव यादव या अधिकाऱ्यांसह देशभरातून दीडशेहून अधिक शिवभक्त सहभागी झाले आहेत.

ऐतिहासिक तिकोण्यावरील वेताळ दरवाजा, आठफुटी मारुती, चुणा मळण्याचा घाणा ही ठिकाणे पाहून दुर्ग अभ्यासक दिपक पटेकर यांनी तिकोणा सह तुंग किल्ल्याविषयी सखोल मार्गदर्शन केले. पहिल्या दिवशी तिकोणा व तुंग किल्ल्यावर जाऊन इतिहासाची अनुभूती घेतली. रविवार (दि.28 ) उंबर खिंड व सुधागडची उर्वरित मोहीम पूर्ण करण्यास सुरूवात झाली. दरम्यान , ज्येष्ठ इतिहास संशोधक अप्पा परब यांचे उंबरखिंडचा रणसंग्राम तसेच बाल शिवव्याख्याते गोपाल शेळके ह्यांचे शिवशौर्य या विषयावर व्याख्यान झाले. मोहिमेचे नेतृत्व दुर्ग अभ्यासक प्रशांत साळुंखे, महेश पाटील, विक्रमसिंह घाडगे , स्वप्निल घोलप, शिवव्याख्याते दिपकराव करपे, संतोष शेळके, आदित्या ओरड, रोहित बडीगेर यांच्यासह शिवराष्ट्रचे सदस्य करत आहेत.

-Ads-

शिवराष्ट्र हायकर्स-महाराष्ट्रने पदभ्रमंती मोहिमेत 26 ते 28 जानेवारी 2018 रोजी तुंग-तिकोणा-उंबरखिंड-सुधागड ही गडकोट मोहीम हाती घेतली आहे. महाराष्ट्रात 350 अधिक गडकोट आहेत. मात्र, काहीच गडकोटांवर सहज जाता येते. मात्र, आडवाटेवरच्या या महाराष्ट्रातील गडकोटांवर शिवराष्ट्र हायकर्सच्या माध्यमातून गेल्या 17 वर्षांपासून सह्याद्रीच्या हाकेला साद देत किल्ल्यांची भटकंती सुरू आहे. खासदार राजू शेट्टीच्या समवेत 150 शिवभक्‍तांनी किल्ले तिकोना व किल्ले तुंग सफर केली. यावेळी परिसरातील तरुण या मोहिमेत सहभागी झाले होते

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)