इतर पक्षांनाही पाठिंब्याचे आवाहन करणार – कोविंद

नवी दिल्ली  – राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी केंद्रातील सत्तारूढ एनडीएची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद आज सायंकाळी पाटणाहून देशाची राजधानी दिल्लीत दाखल झाले. सहमतीचा उमेदवार बनण्यासाठी इतर पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन करणार असल्याचे कोविंद यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मोठी जबाबदारी मिळालेला मी सामान्य नागरिक आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. दरम्यान, कोविंद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. ते 23 जूनला उमेदवारी अर्ज सादर करतील, असे समजते. सत्तारूढ आघाडीचे उमेदवार असणाऱ्या कोविंद यांना एनडीएबाहेरील पक्षांचाही पाठिंबा मिळू लागला आहे. आतापर्यंत बिजद, तेलंगण राष्ट्र समिती आणि वायएसआर कॉंग्रेस या पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)