इतक्‍यात लग्न करायचे नाही- तापसी पन्नू

सध्या बॉलीवूडमध्ये एन्गेजमेंट आणि लग्नाचा सीझन जोरात सुरू आहे. एकीकडे प्रियांका चोप्राची एन्गेजमेंट झाली, दीपिका- रणवीर सिंह आणि आलिया-रणबीर कपूरच्याही लग्नाची बोलणी सुरू आहेत. त्याच लग्नसराईमध्ये तापसी पन्नूच्या लग्नाबाबतही चर्चा सुरू आहे.

बॅडमिंटनपटू मिथियास बोयबरोबर तापसी स्वीट रिलेशनशिपमध्ये आहे. त्याच्याबरोबर लग्न करण्याच्या प्रश्‍नाला मात्र तापसीने नकारार्थी उत्तर दिले आहे. आपल्याला इतक्‍या लवकर लग्न करायचेच नाही. सध्या तर नवीन सिनेमांच्या खूप चांगल्या ऑफर येत आहेत. त्यामुळे सध्या तरी आपल्या फिल्मी करिअरवरच लक्ष केंद्रित करायचे आहे, असे तापसीने सांगितले.

-Ads-

ती आणि मिथियास बोयच्या रिलेशनशिपबाबत आताच कुठे मीडियाला समजले आहे. या दोघांनी काही हिलस्टेशनवर सुट्टी एन्जॉय केल्याचे फोटोही सोशल मीडियावर पसरले होते. मिथियासबरोबर तापसी कधीपासून रिलेशनशिपमध्ये आहे आणि लग्नाबाबतचा तिचा प्लॅन काय आहे, या सगळ्या गोष्टींबाबत तिने काहीही वाच्यता केलेली नाही.

“मनमर्जिया’ हिट झाला आणि तापसी पन्नू एकदम “सातवे आसमांन’ वर पोहोचली. तिच्या चेहऱ्यावर हा आनंद स्पष्ट दिसतो आहे. आपल्या या आनंदी चेहऱ्यामागील राज तिनेच रविवारी ट्विट करून सगळ्यांबरोबर शेअर केला आहे. हे वर्ष तिच्यासाठी खरोखरच खूप फलदायी ठरले. करिअरचा ग्राफ या वर्षात खूपच उंचावला, म्हणून ती भलतीच खुशीत आहे. या वर्षात तिला ज्या ज्या व्यक्‍तींनी मदत केली आणि त्यांच्या सहाय्याने तिला व्यवसायिक यश मिळाले, त्या सगळ्यांचे तिने आभार मानले आहेत.

नीतीशास्त्र. सुरमा, मुल्क, नीवेवारो आणि मनमर्जियां या सारखे व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपट तिच्या नावावर जमा झाले आहेत. तिच्या जवळ सध्या “तडका’ आणि “बदला’ हे आणखीन दोन सिनेमे आहेत. “तडका’ हा 2011 च्या मल्याळम ब्लॉकबस्टर “सॉल्ट अॅन पीपर’चा रिमेक आहे. तर”बदला’मध्ये ती मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्याबरोबर दिसणार आहे. याचे शुटिंग सध्या ग्लासगोमध्ये सुरू आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)