इटानगर – अरूणाचल प्रदेशची राजधानी इटानगरला शुक्रवारी ढगफुटीनंतर पुराचा तडाखा बसला. त्या नैसर्गिक आपत्तीत तिघे मृत्युमुखी पडले, तर दोघे बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. पुरामुळे 26 घरे उद्धवस्त झाली, तर 60 हून अधिक घरांचे नुकसान झाले.

पुराच्या पाण्यात काही कार आणि दुचाक्‍याही वाहून गेल्या. शहरातील काही रस्त्यांचेही मोठे नुकसान झाले. अचानक आलेल्या पुरानंतर तातडीने मदत आणि बचाव कार्य हाती घेण्यात आले. त्यामध्ये आपत्ती प्रतिसाद दलाची पथके सहभागी झाली. बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यात येत आहे.

दरम्यान, अरूणाचलचे मुख्यमंत्री पेमा खंडू यांनी जीवितहानीबद्दल दु:ख व्यक्त केले. त्यांनी मृतांच्या कुटूंबीयांना प्रत्येकी 4 लाख रूपयांची मदत जाहीर केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)