इटलीत वादळामुळे पूल कोसळला

मिलान – इटलीमध्ये अचानक आलेल्या जोरदार वादळामुळे एक मोठा पूल कोसळला आणि पूलाखालील वाहनांचा चक्काचूर झाला. इटलीतील जेनोव्हा शहरात ही घटना घडली. या दुर्घटनेमध्ये काही जिवीतहानी झाली असावी, असा अंदाज स्थानिक प्रसिद्धी माध्यमांनी वर्तवला आहे. मात्र जेनोव्हाच्या पोलिस अधिकारी मारिया ल्युईसा काटालानो यांनी मात्र याबाबत काहीही ठामपणे सांगितले नाही. मदत आणि बचाव कार्य पूर्ण होईपर्यंत जिवीतहानीबाबत काहीही खात्रीशीर वृत्त देता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.

इटली ते फ्रान्सला जोडणाऱ्या महामार्गावर ही दुर्घटना घडली. मोरांडी पूलाचा 200 मीटरचा भाग औद्योगिक वसाहतीवर कोसळला असल्याचे परिवहन मंत्री डॅनिलो टोनिएली यांनी सांगितले. इटलीतील सर्वात मोठा फेरागोस्तो या सुटीचा दिवस उद्या आहे. त्यामुळे इटलीतील अनेक नागरिक समुद्रकिनाऱ्यांवर आणि पर्वतारोहणासाठी गेले आहेत. अन्यथा या महामार्गावर नेहमी खूप वाहतूक असते. या मार्गावर गॅस पाईपलाईनही असल्याने आणखी आपत्तीची शक्‍यता असल्याचे अग्निशामक दलांनी म्हटले आहे.

मोरांडी पूलाचे उद्‌घाटन 1967 साली झाले होते. 90 मीटर उंच आणि सुमारे एक किलोमीटर लांबीचा हा पूल आहे. फ्रान्सला जाणाऱ्या ए 10 मार्ग आणि उत्तरेकडील मिलानकडे जाणाऱ्या ए 7 या महामार्गांना हा पूल जोडतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)