इटलीतील वादळाच्या तडाख्यात 11 ठार 

व्हेनिस शहर जलमय 

व्हेनिस: वादळी वारे आणि पावसाच्या तडाख्यामुळे इटलीच्या वायव्य भागात आतापर्यंत 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर खबरदारी म्हणून शाळा, कॉलेज आणि पर्यटन स्थळे बंद ठेवण्यात आली आहेत. सुमारे 180 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे किनारपट्टीवरच्या टेराचिना शहरात एकाचा मृत्यू तर 10 जण जखमी झाले आहेत. अंतर्गत जलमार्गासाठी प्रसिद्ध असलेल्या व्हेनिस शहरात पुरामुळे जनजीवन विस्कळित झालं आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या या शहराचा 75 टक्के भाग जलमय झाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुराच्या पाण्याने धोक्‍याची पातळी ओलंडल्यांनतर व्हेनिस शहरातलं मुख्य मार्केट सोमवारपासून बंद करण्यात आले आहे.
काही लोक उंच लाकडी पादचारी मार्गांचा वापर करत आहेत. मार्केटमधील दुकानदार पुराचं पाणी दुकानात घुसू नये म्हणून प्रयत्न करत आहेत. व्हेनिस शहराच्या उत्तरेकडे जोरदार वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली आहेत. अशा घटनांमध्ये व्हिनिटो इथे आपत्ती व्यवस्थापनाच्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

भूस्खलनामुळे घर पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर ट्रेंटो सरोवरात स्वत:ची बोट शोधायला गेलेल्या मासेमाराचा मृतदेह सापडला आहे. या आपत्तीत सोमवारी 6 तर मंगळवारी 5 लोकांचा बळी गेल्याची माहिती सरकारने दिली आहे.
इटलीच्या पश्‍चिम किनाऱ्याला वादळाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. रॅपालो बंदराजवळची भिंत कोसळल्याने तिथे 19 लोक अडकले होते. त्यांना वाचवण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली. इटलीची राजधानी रोमध्येही झाडे उन्मळून पडली आहेत. बऱ्याच भागांत वीजपुरवठा खंडित झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)